‘लाखों अदाओं की अब जरुरत ही क्या है, जब वो फ़िदा ही हमारी सादगी पर है’, पाहा मानसीच्या दिलखेच अदा

'लाखों अदाओं की अब जरुरत ही क्या है, जब वो फ़िदा ही हमारी सादगी पर है', पाहा मानसीच्या दिलखेच अदा


मराठी सिनेसृष्टीत आपल्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी मानसी नाईक तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तिच्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली आहे. प्रदीप खरेरासोबत लग्न करून मानसी आता संसारात चांगलीच रमलेली दिसत आहे.

मानसीच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. या खास प्रसंगी तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा वर्षाव केला. पोस्ट केलेल्या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. यात तिने हिरव्या रंगाची जरीची साडी परिधान केली आहे. जड कानातले आणि बांगडयानी तिच्या रूपात आणखीच भर टाकली आहे.

हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने लिहले, “जर ते माझ्या साध्यापणावर फिदा असतील, तर मला लाखो अदांची काय गरज!” तसेच पती प्रदीपने या फोटोखाली “लव्ह यु” म्हणत कमेंटदेखील केली आहे.

याव्यतिरिक्त, याच लूकमध्ये तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ‘नवरी दिसतेस गं’ गाण्यावर प्रेक्षकांना घायाळ करणारे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही चंद्र, तुमची चांदणी, दिसते मी चमक दामिनी, माझे यौवन मद कामिनी, रात चांदणीने हो नटली, गंध मंदार बाग फुलदार बहरली, राया चंदनी काया शृंगाराने ही सजली.” या व्हिडिओलाही चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच, व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक व्हिव्ज तर 50 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मानसी नाईक हीने 2007 साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.