Wednesday, July 3, 2024

सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करून मिताली मयेकरने लावली ‘ही’ पैंज

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच यासाठी त्यांना खूप काळ लागला. परंतु, अगदी कमी कालावधीत आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही. पण तरी देखील आज ती खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. अवघ्या २४ वर्षाच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या जोरदार चर्चेत आहे.

मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने कट शोल्डर पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पिवळ्या रंगाचा बॉडी फिट स्कर्ट परिधान केला आहे. यासोबत तिने कानात मोठ्या रिंग घालून केस मोकळे सोडले आहे. ज्यात ती फारच आकर्षक दिसत आहे. ( Marathi actress mitali mayekar share her glamorous photos on social)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी पैंज लावू शकते की, तुम्ही माझ्याबद्दलच विचार करत आहात.” तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोला आतापर्यंत ३० हजारापेक्षाही जास्त लाइक्स आले आहेत. सोशल मीडियावर तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तिने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. तो देखील एक अभिनेता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा