Thursday, April 17, 2025
Home मराठी आहा सुंदर! मृण्मयी देशपांडेच्या नव्या लूकने घातली चाहत्यांना भुरळ, साडीमधील फोटो आले समोर

आहा सुंदर! मृण्मयी देशपांडेच्या नव्या लूकने घातली चाहत्यांना भुरळ, साडीमधील फोटो आले समोर

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृण्मयीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाची नेटची साडी नेसली आहे. यावर तिने लायनिंगचा ब्लाऊज परिधान केला आहे. तिने सगळे केस मागे बांधून कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. कपाळावर लावलेल्या छोट्याशा टिकलीने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे. एकंदरीत या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress mrunmayee Deshpande share her photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “अजून काही.” तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.‌अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “खूप खूप सुंदर दिसतेस.” यासोबतच अनेक चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करून तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा