Sunday, August 10, 2025
Home मराठी ‘सगळ्यात अवघड काय असेल तर..’ निवेदिता सराफ यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

‘सगळ्यात अवघड काय असेल तर..’ निवेदिता सराफ यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अभिनेते अशोक सराफ यांनी विनोदी भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका असो प्रत्येक भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचप्रमाणे निवेदिता सराफ यांनीही आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी चित्रपट जगतात लोकप्रियता मिळवली आहे. सध्या निवेदिता सराफ यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांंगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी लिहलेला भावूक कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधत आहे. 

मराठी सिनेजगतातील अभिनयाचे बादशहा म्हणून अशोक सराफ यांचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अनेक दशके सिने जगतावर अधिराज्य गाजवले आहे. अशोक सराफ यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी निवेदिता सराफही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अशोक सराफ दोघांची प्रेमकथा बहरली होती आणि शेवटी दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सध्या निवेदिता सराफ अभिनयापासून लांब असल्या तरी सोशल मीडियावर मात्र चांगल्याच सक्रिय असतात. सध्या त्यांनी त्यांच्या मुलासाठी लिहलेली एक खास पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ प्रसिद्ध शेफ असून तो अमेरिकेत शिक्षण घेत आहे. नुकताच तो वाढदिवसानिमित्त भारतात आला होता. वाढदिवस झाल्यानंतर तो पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याला सोडायला अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पोहोचले होते. यावेळचा एक फोटो निवेदिता सराफ यांनी आपल्या सोशल मीडिया  अकाउंटवरुन शेअर केला आहे. आपल्या मुलाला निरोप देताना त्या चांगल्याच भावूक झाल्याच दिसत आहे. या फोटोसोबत निवेदिता सराफ यांनी आपल्या मुलाला बाय म्हणण सगळ्यात अवघड असतं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत खरच आपल्या मुलांना निरोप देणं अवघड असत म्हणल आहे.

हे देखील वाचा