Friday, March 29, 2024

Brahmastra Trailer: ‘ब्रम्हास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर आला समोर, रणबीर आलियाची जबरदस्त केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क

बॉलिवूडची नवविवाहित जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या बहुचर्चित ब्रम्हास्त्र चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट  आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना या क्यूट कपलची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.  आता आलिया आणि रणबीर कपूरच्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलरही रिलीझ झाला असून प्रेक्षकांचा त्याला जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या पौराणिक कथांवर आधारित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अमिताभ बच्चनच्या आवाजाने आणि रणबीर कपूरच्या झलकांनी सुरू झालेला ट्रेलर, महाबली आणि त्याच्या हातातील सर्वशक्तिमान शस्त्र शोधण्याची कहाणी सांगते. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. ज्यामध्ये शस्त्रांची देवता ‘ब्रह्मास्त्र’ची शक्ती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महानायक मेगास्टार अमिताभ बच्चन, साऊथचा सुपरस्टार नागार्जुन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय यांची झलक पाहायला मिळते. ट्रेलर पाहून असा अंदाज वर्तवला जात आहे की, ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमापासून ते ब्रह्मास्त्रावरील युद्धापर्यंतची कथा पाहायला मिळेल. हा बहुचर्चित चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३०० कोटी रुपयाच्या या बिगबजेट चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा