टेलिव्हिजनपासून चित्रपटसृष्टीपर्यंत यशस्वीरीत्या प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. तिच्या करिअरच्या प्रवासाला सुरुवात झाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेत तिने अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीचे पात्र निभावले होते. यातून तिला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मग तिच्या करिअरची गाडी अशी धावली की, तिला लागोपाठ चित्रपट मिळाले आणि तिने खूप प्रसिद्धी मिळवली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.
प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सुंदर अशी नेटची साडी आणि ब्लाऊज घातला आहे. यासोबतच तिने सुंदर ज्वेलरी घातली आहे. ज्यात ती अप्रतिम दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘दिल तो बच्चा है जी’ हे गाणे लागले आहे. हा गाण्यावर ती वेगवेगळे हावभाव करताना दिसत आहे. (Marathi actress prarthana behere share her video on social media)
सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत २३ हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत.
प्रार्थना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक झलक बघण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झालेले असतात. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची नेहा नावाची भूमिका सगळ्यांना खूप आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती
-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत
-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा