‘पावरी हो रही है’च्या ट्रेंडमध्ये सहभागी झाली अभिनेत्री प्रिया बापट, पाहा तिचे मनमोहन फोटो आणि जबरदस्त व्हिडीओ


सध्या सोशल मीडियावर दानानीर मुबिन हिच्या पावरीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय. तिच्या त्या चार सेकंदाच्या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा अधिक व्युज मिळाले होते आणि तिला त्या एका वाक्यामुळे रातोरात प्रसिद्ध मिळाली. केवळ सोशल मीडियावरवरच नव्हे तर बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना सुद्धा या मुलीच्या त्या वाक्याने भलतेच वेड लावले आहे.

बॉलिवूड कलाकारांमध्ये दिपिका पादुकोन आणि शाहीद कपूर यांनी सुद्धा पावरी ट्रेंडचा मिम्म आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिने सुद्धा या ट्रेंडमध्ये उडी घेतली.

प्रिया बापटने मराठी चित्रपटांसोबतच बॉलीवूड इंडस्ट्री आणि वेब सिरीजमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसेच ती सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असून काही ना काही फोटो चाहत्यांच्या भेटीला पोस्ट करत असते. नुकतेच तिने पारंपरिक अंदाजात केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. हा फोटोशूट तिने लाल, पिवळ्या ड्रेसमध्ये केलेला असून प्रियाने यावर सध्या ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या पावरीचे कॅप्शन दिले. तिच्या या फोटोंना हजारांच्यावर लाईक आले असून त्यात ‘जस्ट बिफोर द पावरी’ असे त्याला कॅप्शन दिले आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला असून त्यावर छान प्रतिक्रिया येत आहेत.

सोबतच तिने ‘ पावरी हो रही है’  व्हिडिओ देखील तयार करून आपल्या इंस्टा रीलला शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, तो चित्रित करताना तिला आपले हसू आवरणे कठीण होऊन बसले आहे. हा व्हिडीओ तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटोशूट दरम्यान केला. ज्यात ती बोलत आहे कि, ‘यै मै हु, ये मेरी टीम है और पाये हमारी पावरी हो रही है.’ तिचा हा व्हिडिओ सुद्धा चाहत्यांना खूप भावला आहे.

प्रिया लवकरच सिटी ऑफ ड्रीमच्या दुसऱ्या सिजनमध्ये झळकणार आहे. तिने नुकतेच या वेब सिरीजचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. सोबतच ती एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये देखील दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे प्रमुख असल्याचे बोलले जात आहे. याचे चित्रीकरण सिंगापूरमध्ये सुरु होणार आहे.

सन २००० साली प्रसिद्ध झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली होती. पुढे तीचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट खूपच गाजला. सोबतच काकस्पर्श, टाईमपास २, टाईम प्लीज , वजनदार या मराठी चित्रपटांसोबतच मुन्नाभाई.एम.बी.बी.एस आणि लगे राहो मुंन्नाभाईमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाचे कौशल्ये दाखविले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.