Wednesday, April 30, 2025
Home मराठी जब्याच्या ‘शालू’चा नखरा लय भारी!! अभिनेत्री राजेश्वरी खरातचा नवा व्हिडिओ पाहून चाहत्यांची दांडी गुल!

जब्याच्या ‘शालू’चा नखरा लय भारी!! अभिनेत्री राजेश्वरी खरातचा नवा व्हिडिओ पाहून चाहत्यांची दांडी गुल!

मराठी सिनेसृष्टीने या सिनेजगताला अनेक उत्तम कलाकार दिले आहेत, ज्यांनी आपल्या सकारात्मक, नकारात्मक, हसऱ्या, रडक्या अशा अनेक भूमिकांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री ‘राजेश्वरी खरात’. राजेश्वरीने फार चित्रपटांमध्ये काम केलेले नाही, परंतु तिने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ सिनेमात साकारलेली ‘शालू’ची भूमिका देशभर गाजली.

तिला या भूमिकेने सर्वांच्या गळ्यातील ताईतच केले. तिला जब्याची म्हणजेच सोमनाथ अवघडेची शालू म्हणून ओळखले जाते. राजेश्वरीचा सोशल मीडियावर जबरदस्त चाहतावर्ग आहे. ती नवनवीन फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. अशातच तिचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून जणू चाहत्यांची दांडीच गुल झाली.

राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती एका इंग्रजी गाण्यावर नाचताना दिसत आहे. खरं तर ‘फँड्री’ सिनेमात अत्यंत साधी भोळी असणारी राजेश्वरी इथे मात्र, ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांना दिसत आहे.

राजेश्वरीने ‘फँड्री’नंतर ‘आयटमगिरी’ या सिनेमात काम केले, परंतु ‘फँड्री’इतकं यश या चित्रपटाला मिळू शकलं नाही.

‘फँड्री’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे हा सिनेमा १.७५ कोटी रुपयांमध्ये तयार झाला होता. यानंतर सिनेमा रिलीझ झाल्यानंतर तब्बल ७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा