Sunday, April 14, 2024

“माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ संतप्त पोस्ट झाली व्हायरल

आपल्या देशात अशा काही घटना घडत आहे की, ज्याबद्दल ऐकून खरंच वाटते की जग २२ व्या शतकात आहे की नाही. एकीकडे देश चंद्रावर यान पाठवत आहे, तर दुसरीकडे दोन महिलांवर अमानुष अत्याचार केले जात आहे. नुकतीच मणिपूरमध्ये संपूर्ण देशाला हादरून टाकणारी अतिशय लाज वाटणारी अशी भयानक घटना घडली. दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पडत आहे. कलाकारांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

अशातच आता मराठीमधील ग्लॅमरस अभिनेत्री असलेल्या रुचिरा जाधवने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. रुचिराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यात तिखट शब्दात तिचे मत व्यक्त केले आहे. तिने लिहिले, “रोज अशा “छोट्या मोठ्या” घटना घडतात, आपल्या आजूबाजूला… आपल्या ऐकण्यात वा बघण्यात.. आपण ऐकतो, बघतो, तात्पुरतं रिअॅक्ट करतो आणि सोडून देतो. मग अशी एक घटना घडते जी आपल्याला हलवून टाकते. माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते. पण करायचं काय, हा प्रश्न उभा असतो. पुन्हा रिअॅक्ट होऊन सोडून द्यायचं… अजून काय…!! पण “शहाणपण” हे समजण्यात आहे की, या सगळ्याचं मूळ कुठे आहे. त्या “छोट्या मोठ्या” घटनेंकडेच आपण दुर्लक्ष केलं नाही ना, तर ही वेळच येणार नाही…माझ्या बहिणींनो, स्वत:वर अन्याय होऊ देऊ नका. मग तो कितीही छोटा असो किंवा ती सो कॉल्ड “समाजमान्य” गोष्ट असो. तुमच्या विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करायला शिका. काय आहे ना, Being Women काही गोष्टी “जन्मत:च” आपल्यावर लादल्या जातात. “Granted” घेतलं जातं. आपण ते सगळं मान्य करतो, “ही आपली चूक” आपल्या बुद्धीला पडत असणारे प्रश्न आपण विचारत नाही..“ही आपली चूक” आपण अन्याय सहन करतो “ही आपली चूक” एक स्त्री म्हणून रोज नवीन प्रश्न पडतात. “पटतील” अशी उत्तर मात्र कुठेच सापडत नाहीत. आणि याला जबाबदार केवळ “पुरुषवर्ग” नाहीये हा.. याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने स्त्रीजातीला “गृहीत” धरलंय. हे थांबलं पाहिजे. ruchira says I urge for EQUALITY कारण हेच “मूळ” आहे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

दरम्यान रुचिराने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून ग्लॅमरस भूमिका साकारत चांगलीच लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्ये देखील दिसली होती. सोशल मीडियावर तिची चांगलीच क्रेझ आहे.

अधिक वाचा- 
‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

हे देखील वाचा