Wednesday, February 5, 2025
Home मराठी पारंपरिक वेशभूषेत रुपाली भोसलेचा गावरान ठसका! चाहता म्हणाला, ‘खरंच तुझ्या सौंदर्याला…’

पारंपरिक वेशभूषेत रुपाली भोसलेचा गावरान ठसका! चाहता म्हणाला, ‘खरंच तुझ्या सौंदर्याला…’

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरीत्या रेखाटले आहे. या मालिकेतील नकारात्मक भूमिका देखील चांगलीच गाजत आहे. ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले निभावत आहे. तिच्या भूमिकेचे नाव संजना असे आहे. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘मराठी बिग बॉस २’ ची स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्यावर्गात कमालीची भर पडली आहे. अशातच रुपालीचे पारंपरिक वेशभूषेतील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रुपालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुपालीने नऊवारी ब्राह्मणी साडी नेसलेली आहे. तिने पोपटी रंगाची निळा काठ असलेली अत्यंत सुंदर साडी नेसलेली आहे. केसांचा अंबाडा घातला आहे. गळ्यात कोल्हापुरी साज तसेच ठुशी घातलेली आहे. तिने कपाळी चंद्राची कोर लावली आहे. तसेच नाकात नथ घातलेली आहे. या पारंपरिक वेशभूषेवर तिने पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली आहे. त्यामुळे तिच्या या लूकला परिपूर्णता आलेली दिसत आहे.

रुपालीच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या सातत्याने प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या या फोटोवर अभिनेता माधव देवचक्के याने “कडक,” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते देखील कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “खरंच तुझ्या सौंदर्याला तोड नाही,” अशी कमेंट केली आहे.” दुसऱ्या एकाने “विषय कट,” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एकाने “अप्सरा आली,” अशी कमेंट केली आहे. रुपालीचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (marathi actress rupali bhosale’s traditional look viral on social media)

रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच रुपालीला २०२१ चा युथ आयकॉन पुरस्कारही मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा