Saturday, July 6, 2024

ऋतुजा बागवेचे आकर्षक आणि सुंदर फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने चक्क तिला घातली लग्नाची मागणी

मराठी टेलिव्हिजनवर जेव्हा सोज्वळ अभिनेत्रींचे नाव निघते तेव्हा अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या नावाचा त्या यादीत हमखास समावेश असतो. ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण प्रत्येक भूमिकेत ती सोज्वळ अंदाजात दिसली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती बहुतांश वेळा तिचे साडीमधील फोटो शेअर करत असते. आता देखील तिचे असेच साडीमधील काही सुंदर फोटो समोर आला आहे.

ऋतुजाने सोशल मीडियावर तिचा साडीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने चॉकलेटी रंगाची खण साडी नेसली असून, पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तिने साडीचा पदर गळ्याला गुंडाळून हातावर घेतला आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहेत. (Marathi actress Rutuja bagwe share her photo on social media)

नेहमी प्रमाणेच तिचे चाहते या लूकला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री अक्षया नाईकने “माझ्याशी लग्न करशील का?” अशी कमेंट केली आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा