आपल्या भारतात सणांची अनेक वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्व आहे. प्रत्येकजण हे सण खूप उत्साहाने साजरे करतात. यातील एक म्हणजे गौरी गणपतीचा सण. सध्या सर्वत्र या सणाचा जल्लोष चालू आहे. मराठी चित्रपटसृष्टीत देखील कलाकार त्यांच्या घरी या सणाचा आनंद घेत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री समिधा गुरू हिने तिच्या घरातील गौरींचे फोटो शेअर केले आहेत.
समिधाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गौरीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गौरी गणपतीची खूप छान सजावट केलेली दिसत आहे. तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. ती तिच्या गौराईंना सजवताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत मृणाल देशपांडे दिसत आहेत. त्या दोघी मिळून गौरींना तयार करत आहे. तसेच दोघींनी गौरीसोबत फोटो काढले आहेत. (Marathi actress samidha guru share a photo with her home gauri)
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आली गौराई अंगणी, तिला लिंबलोन करा.” तिच्या घरातील ही सजावट आणि गौरी तिच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तिने गौरीला खूप सुंदर तयार केले आहे.
समिधा गुरूच्या चित्रपटातील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम.केले आहे. तिने ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘पन्हाळा’, ‘लाल इश्क’, ‘मोगरा फुलला’, ‘दुसरा’, ‘शुभमंगल ऑनलाईन’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘अवघाची संसार’ या मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. समिधा गुरूचा पती अभिजित गुरू हा देखील एक खूप चांगला अभिनेता आहे. त्याने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत
-जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’