Friday, November 22, 2024
Home मराठी ‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

मराठी मालिकांमधून अनेक नवीन अभिनेत्री टेलिव्हिजनवर पदार्पण करतात. काही अभिनेत्री एकाच मालिकेत काम करून एक्झिट घेतात, तर काही मात्र या शर्यतीत टिकून राहतात आणि मेहनतीने त्यांचे नावलौकिक करतात. याच यादीतील एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev) होय. सायलीने ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या एकाच मालिकेने सायलीला इतकी ओळख मिळाली की, पुढे ती यशाच्या मार्गावर चालतच राहिली. ‘काहे दिया परदेश’ ते नुकताच सुपरहिट झालेला ‘झिम्मा’ हा सायलीचा आतापर्यंतचा प्रवास. सुरुवातीला मालिका आणि चित्रपटात अत्यंत साधी भोळी दिसणारी सायली ‘झिम्मा’ चित्रपटात मात्र चांगलीच बोल्ड अंदाजात दिसली आहे. एवढंच काय तर तिने या चित्रपटात एक किसींग सीन देखील दिला आहे. परंतु लोकांच्या अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही की, सायलीने हा बोल्ड सीन दिला आहे. तसेच ती असे करूच शकत नाही, असे अनेकांचे मत आहे. याबाबत सायलीने तिचे मत व्यक्त केले आहे.

माध्यमांना दिलेल्या या मुलाखतीत तिने सांगितले की, “एखादा किसिंग सीन किंवा अगदी इंटिमेट सीन करायचा असेल, तर तुमचा कम्फर्ट महत्त्वाचा. जर कम्फर्ट नसेल, तर भूमिकेची गरज आहे म्हणून जबरदस्तीने करायचा, तर तसंही करू नये. मी तरी याबाबतीत हेच निकष मानते. मला कोणत्याही एका इमेजमध्ये अडकून पडायचं नाहीये.” तिला भूमिकांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायचेत असंही सायलीने आवर्जुन सांगितले. सायलीने आतापर्यंत अनेक गुड लूकिंग कलाकारांसोबत काम केले आहे, पण करिअरच्या पिकला असताना तिने ‘आटपाडी नाईट्स’ या सिनेमात नॉर्मल लूक असलेला आणि मुख्य हिरो नसलेल्या प्रणव रावराणेसोबतही नायिका म्हणून काम केलं. यावर तिचं म्हणणं आहे की, “माझ्यासाठी लूक महत्त्वाचा नाही, तर समोरच्या कलाकाराचा अभिनय, सिनेमाची कथा हे मुद्दे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत.” (Marathi actress sayali sanjeev give her statement about intimate scenes in interview)

“मी जर अभिनेत्री बनले नसते, तर नक्कीच राजकीय विश्लेषक झाले असते. राजकारण मला फार आवडतं. मी त्याच्याशी संबंधित खूप बातम्या पाहते. पण हेच सांगताना तिने नमूद केले की, राजकारणातलं सत्ताकारण मला आवडत नाही. मला बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे हे नेते फार आवडतात. बाळासाहेब कधीही सत्तेवर नव्हते, पण तरीही सत्ता त्यांच्या हातात होती हे मला फार आवडायचं. म्हणजे त्यांच्या नुसत्या एका हाकेवर महाराष्ट्र बंद होताना पाहिलाय मी, तर शरद पवार म्हणजे जे नेहमी पुढचा विचार करून राजकारण करतात असे हुशार नेते. आणि राज ठाकरेंच्या भाषणांची तर मी फॅन आहे,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि तिच्या रिलेशनबाबत अनेक येत होत्या. यावर देखील तिने मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, “क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत आपलं खूप चांगल्या मैत्रीचं नातं आहे. लोकांनी उगाच चुकीच्या बातम्या पसरवल्या. आता त्यामुळे ऋतुराजने काही चांगली कामगिरी केली, तर मी त्याचं उघडपणे अभिनंदनही करू शकत नाही.”

सायलीच्या ‘झिम्मा’ या चित्रपटाने दोन आठवड्यातच कोटींचा व्यवसाय केला आहे. तिच्या करिअरमध्ये ती झेप घेत असली, तरी दुसरीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ती दुःखाला सामोरे जात आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-‘बाबा जाऊ नको दूर…’, वडिलांच्या निधनाची माहिती देत, सायली संजीवने शेअर केली भावनिक नोट

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा