Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिवानी बावकरच्या हास्याने जिंकले चाहत्यांचे मन; पाहायला तिची मिळाली दिलखेचक अदा

मराठी चित्रपट सृष्टीतील आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शिवानीने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिर झालं जी’ मध्ये मुख्य भूमिकेत काम केले होते. यानंतर महाराष्ट्रातील घराघरात ती लोकप्रिय झाली आहे. खरंतर ही शिवानीची पहिलीच मालिका होती, पण तिचा उत्कृष्ट अभिनय आणि संवाद कौशल्याने तिने सर्वांचेच मन जिंकून घेतले होते. या मालिकेत तिने शीतल हे पात्र साकारले होते. शिवानी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

शिवानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा चेक्सचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. या फोटोमधील तिची निरागस स्माईल प्रेक्षकांना वेड लावत आहे.

हा सुंदर फोटो पोस्ट करून तिने कॅप्शन दिले आहे की, “जर तुम्हाला कोणी आनंद देत असेल, तर त्याला त्यापेक्षाही जास्त आनंद द्या.” तिचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. सर्वत्र शिवानीच्या फोटोची चर्चा चालू आहे. या फोटोला आतापर्यंत ५० हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहे. तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवे हीने देखील शिवानीच्या या फोटोवर कमेंट केली आहे. (Marathi actress shivani baokar’s photo viral on social media)

शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केले आहे. त्यानंतर तिने ‘उंडगा’ आणि ‘युथ ट्यूब’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने काही म्युझिक व्हिडिओ मध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कलाकारांपेक्षाही अधिक लाइमलाइटमध्ये आहेत त्यांची मुलं; जाणून घ्या ‘या’ स्टारकिड्सबद्दल

-मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू

-सोनम कपूरच्या घरी आला नवीन चिमुकला पाहुणा; फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

हे देखील वाचा