बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नुकतीच काही दिवसांपूर्वी भारतात परत आली आहे. भारतात आल्यापासून ती खूपच चर्चेत आहे. सोनम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतंच सोनम कपूरच्या घरात एक नवीन सदस्य आला आहे. सोनमने या नवीन सदस्याची सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत ओळख करून दिली आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिच्या घरात आलेल्या छोट्याशा पाहुण्याची ओळख करून दिली आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी तुम्हाला कपूर परिवारातील नवीन सगळ्यात लहान सदस्याची ओळख करून देत आहे. हा आहे रसेल क्रो कपूर. येथे पाहा त्याच्यासोबत माझ्या आनंदाची झलक.” सोनमने तिच्या नवीन आणलेल्या कुत्र्यासोबत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच खुश दिसत आहे. (Sonam Kapoor introduce share the picture of new guest)
सोनम कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाँग डेनिम ड्रेस घातला आहे. तसेच तिने तिच्या कुत्र्याला देखील असाच मॅचींग ड्रेस घातला आहे. सोनम कपूर ही मागील काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीमुळे खूप चर्चेत होती. यानंतर तिने याबाबत तिचे मौन तोडले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक बुमरॅंग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हॉट ड्रिंक पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझ्या मासिक पाळीतील पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बॉटल आणि आल्याचा चहा.”
सोनम कपूर ही मागील अनेक दिवसापासून पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत होती. या मागील कारण म्हणजे कोरोना आणि तिच्या पतीचा बिजनेस होय. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने अनेकवेळा सांगितले होते की, ती भारतातील तिचे घर आणि सगळ्या कुटुंबाला खूप मिस करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये झळकणार सोनू सूद; पुन्हा मिळाली फराह खानची साथ