मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू


तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री यशिका आनंद हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातात यशिका गंभीर जखमी झाली आहे. तर या अपघातात तिची मैत्रीण वल्लीचेट्टी भवानी हीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, एका ओव्हर स्पीड एसयूवीईसीआर रोडवर चालली होती. कारने सेंटर मीडियनला टक्कर मारली आणि रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडली. या घटनेनंतर तेथील लोक कारमध्ये असलेल्या लोकांना वाचवायला आले होते.

तीन लोकांना या कारमधून बाहेर काढले गेले. ज्यात यशिका देखील होती. तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यशिकाची परिस्थिती गंभीर आहे. यशिकाची मैत्रीण वल्लीचेट्टी भवानी ही आतमध्ये अडकली होती. ती मदतीची वाट बघत होती. पण तिच्यापर्यंत कोणी पोहचायच्या आधीच तिचा जीव गेला होता. (Bigg Boss fame actress yashika Aanand injured in car accident her friend died in accident)

पोलिसांनी तिचा मृत्यूदेह पोस्टमॉर्टमसाठी चेंगलपेट हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर ही केस दाखल केली जाईल. याबाबत पुढची तपासणी चालू आहे.

यशिका आनंद ही तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने इंस्टाग्राम मॉडेल झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. तिला २०१६ मध्ये मोठा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये ती ‘बिग बॉस २’ मध्ये दिसली होती. त्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले, ‘माझ्या राज्यात राहून…’

-स्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने लावले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप

-‘या’ सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये झळकणार सोनू सूद; पुन्हा मिळाली फराह खानची साथ


Leave A Reply

Your email address will not be published.