कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यात मेकअप, ड्रेस, अभिनय, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या असतात. पण यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशूट. कलाकार नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठे हिचा समावेश होतो. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रुतीने सोशल मीडियावर तिचे काही साडीमधील आकर्षक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. या साडीवर तिने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातला असून, केसांची वेणी घातली आहे. कानात झुमके गळ्यात हार, हातात बांगड्या अशी सगळी ज्वेलरी घातली केली आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि लक्षवेधी दिसत आहे. या काळ्या पैठणीमध्ये आणि महाराष्ट्रीयन लूकमध्ये श्रुतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहें. (Marathi actress Shruti Marathe share her photo on social media)
तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “हेच चेहऱ्यावरील सुहास्य तुझी ओळख आहे.” तर आणखी एकाने “सोनपरी” असे लिहिले आहे. यासोबत आणखी एकाने “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे. अनेकांना तिचा हा फोटो खूप आवडत आहे.
श्रती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’
–‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…
–सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार