Tuesday, July 9, 2024

दिवाळीच्या शुभेच्छा देत, सोनाली कुलकर्णीने साजरा केला तिच्या पतीसोबत पहिला ‘दिवाळसण!’

सध्या दिवाळी हा सण सुरू असल्याने अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. दिवाळी हा असा सण आहे, जिथे माणसांसोबत आपला आनंद द्विगुणित होतो. दिव्यांच्या रोषणाईने आपल्यातील भेदभाव, रुसवे फुगवे दूर होतात. असा हा आनंदाचा सण सगळेच मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. अशातच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नवऱ्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सोनालीने लाल रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घातले आहे. कपाळी टिकली हातात लाल रंगाच्या बांगड्या घालून तिने केस मोकळे सोडले आहेत. या सोबत तिने हातावर मेहेंदी काढलेली देखील दिसत आहे. तिने तिचा पती कुणाल बेनोडकरसोबत देखील काही फोटो शेअर केले आहेत. दोघेही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. (Marathi actress sonalee Kulkarni share a photos with her husband and give best wishes of diwali)

हे फोटो शेअर करून तिने “आम्हा दोघांकडून दिवाळीच्या शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे. यासोबत तिने पहिला दिवाळसण असे देखील लिहिले आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. अनेकांना त्या दोघांची जोडी खूप आवडली आहे. तसेच अनेकजण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

सोनाली आणि कुणालने या वर्षी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. आता देखील अनेकवेळा ती तिच्या पतीसोबत फोटो शेअर करत असते.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा