‘काय गूढ लपलं असेल…’ मराठमोळ्या स्पृहा जोशीच्या कवितेने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं

marathi actress spruha joshi presenting her poem on social media see


अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबत तिला कविता लिहण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा आता तिच्या कवितेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

स्पृहा जोशीने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती बीचवर उभी असलेली दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की यात तिने साधे टी शर्ट परिधान केले आहे व एक वेणी घातली आहे. एकंदरित अशा साध्या लूकमध्येही स्पृहा अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोखाली कॅप्शनमध्ये तिने तिची कविता सादर केली आहे.

कॅप्शनमध्ये स्पृहा म्हणतेय की, “काय गूढ लपलं असेल सतत खळबळणाऱ्या सागराच्या पोटात? काय भाव दाटत असतील सर्वांना सामावणाऱ्या त्या खोल, खोल अंतरंगात..!! किती दुःख पचवलं असेल आजपर्यंत त्याने? कदाचित त्यालाच पचवणाऱ्या अगस्ती ऋषीपेक्षाही जास्तच! म्हणूनच इतक्या पाण्यातही जगत असेल अस्वस्थ, अतृप्त धडपडाटात..! एकटाच जगतोय, जगेल अनादि काळापर्यंत कदाचित याच खिन्नतेत शोधत असेल चांदणं, आकाश पांघरलं असूनही! ढाळत असेल का अश्रू तशाच, एकाकी किनाऱ्याच्या सहाऱ्यात..!!” आता तिचा हा फोटो आणि फोटोखालची कविता दोन्हीही चाहत्यांना चांगलीच भावली आहे. चाहते कंमेट्स करून कौतुकाचे पूल बांधत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोवर आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पृहा होस्ट म्हणून कार्यरत आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.