Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कौतुकास्पद! अभिनेत्री तेजश्री प्रधानने घेतला मोठा निर्णय, दान करणार ‘ही’ अनमोल गोष्ट

तेजश्री प्रधान (tejashree Pradhan) ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौेंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तेजश्रीच्या एका निर्णयाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तेजश्रीने ती अवयव दान करणार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन समोर आली होती. यामुळेच नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत. 

तेजश्री प्रधान ही मराठी चित्रपटजगत आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन अभिनेत्रीने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. तेजश्री सोशल मीडियावर ही नेहमीच प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्टवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात. तेजश्रीचे पाणीदार, बोलके डोळे चाहत्यांना नेहमीच प्रेमात पाडत असतात. हेच सुंदर डोळे अभिनेत्रीने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

अनेक सामाजिक कार्यांमध्ये आवडीने सहभागी होणाऱ्या तेजश्रीने मी नेत्रदान करतेय तुम्हीही करा असे आवाहन करत ही बातमी दिली आहे. तेजश्रीने सक्षम या सामाजिक संस्थेसोबत जोडली गेली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनी जोरदार स्वागत केले असून तिच्यावर सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या तेजश्रीने अनेक गाजलेल्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तेजश्रीने ‘तुझे नी माझे घर श्रीमंताचे’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘होणार सून मी त्या घरची’, ‘प्रेम हे’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच तेजश्रीने ‘ती सध्या काय करते’ सारख्या गाजलेल्या चित्रपटामध्येही काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

 

हे देखील वाचा