Thursday, December 4, 2025
Home मराठी ‘लाजवाब सुंदर दिसते’, म्हणत चाहत्यांनी केले वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसणाऱ्या उर्मिला कोठारेचे कौतुक

‘लाजवाब सुंदर दिसते’, म्हणत चाहत्यांनी केले वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसणाऱ्या उर्मिला कोठारेचे कौतुक

मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. अनेकवेळा ती तिच्या मुलीला देखील डान्स शिकवताना दिसते. अशातच उर्मिलाचे काही फोटो समोर आले आहेत.

उर्मिलाने अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला असून, त्यावर तिने राखाडी रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच गळ्यात एक सुंदर नेकलेस आणि यासोबत केसांची पोनीटेल घातली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या वेस्टर्न लूकमध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे. (marathi actress urmila kotare’s western look photos viral on social media)

तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “लाजवाब सुंदर दिसत आहेस तू” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेकांना तिचा ड्रेस खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या ड्रेसचे कौतुक करत आहेत. याच ड्रेसमधील तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्या सोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा