‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा डायलॉग ऐकला की, अत्यंत मजेशीर आणि मनोरंजनाच्या महासागरात नेऊन ठेवणारा एक धमाकेदार चित्रपट समोर येतो. ज्या चित्रपटातील प्रत्येक सीन पाहताना आयुष्यातील खरा आनंद सापडतो, आपल्या आवडीच्या कलाकारांना स्त्री वेशात पाहून आपल्या हास्याच्या सगळ्या सीमा पार होतात, विनोदी चित्रपटात ज्या चित्रपटाने कितीतरी पुरस्कार त्याच्या नावे केले, ज्याने आख्खा महाराष्ट्राला हसायला भाग पाडले, तो चित्रपट म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडता ब्लॉकबस्टर ‘अशी ही बनवा बनवी’ होय. शुक्रवार (२३ सप्टेंबर) ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त या चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत असणारे सचिन पिळगावकर यांनी एक खास पोस्ट शेअर करून रसिकांचे आभार मानले आहेत.
‘तुमचे सत्तर रुपये वारले’, ‘हा माझा बायको’, ‘तुम्ही आमचे कोण? काका की मामा’, ‘आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकलंय’, ‘निरंजन बाबांचा प्रसाद पावला’, ‘लिंबाचं मटन’ यांसारख्या कितीतरी डायलॉगने लोकप्रिय झालेल्या या चित्रपटाचे नाव आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. आजही ३३ वर्षानंतर हा चित्रपट लागला, तरीही प्रेक्षक अगदी आवडीने हा चित्रपट पाहतात. चित्रपट पाहताना कोणताही सीन बोगस किंवा कंटाळवाणा वाटत नाही.
व्ही शांताराम प्रोडक्शन प्रस्तुत सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट २३ सप्टेंबर, १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. त्यावेळी या चित्रपटाचे फर्स्ट क्लास तिकीट ३ रुपये, तर बाल्कनी तिकीट ५ रुपये एवढे होते. आताच्या काळात विचार केला, तर जवळपास १०० कोटीपेक्षाही जास्त या चित्रपटाचा गल्ला आपण गृहीत धरू शकतो.
या चित्रपटाचे यश म्हणजे या चित्रपटात असणारे कलाकार आणि त्यांचे पात्र. मराठी चित्रपटसृष्टीतील एकंदरीत त्याकाळी प्रसिद्ध असणाऱ्या अनेक कलाकारांनी एकत्र येऊन हा आगळा-वेगळा प्रयोग केला, जो आजही सर्वत्र गाजत आहे. या चित्रपटात कॉमेडीचा बादशाह आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे, जयराम कुलकर्णी या कलाकारांनी एकत्र काम केले होते. चित्रपटाचा आशय देखील अगदी नवीन, काही प्रमाणात भावनिक आणि विनोदी होता. तसेच ‘कोणीतरी येणार येणार गं’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची देखील सर्वत्र चर्चा झाली.
मुंबईसारख्या ठिकाणी येऊन पोटाची खळगी भरण्यासोबत डोक्यावर छप्पर असणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्याकाळी घर मिळवण्यासाठी सगळ्यांनी जोखीम घेऊन जे कृत्य केले ते या चित्रपटात अत्यंत खुमासदार पद्धतीने दाखवले आहे. तसेच सर्वांचे लाडके कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी स्त्री भूमिका साकारली होती. त्यामुळे हा चित्रपट आणखीनच रंगतदार ठरला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘झलक दिखला जा’च्या सेटवर शिल्पाने मांडल्या वेदना, माधुरीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली अभिनेत्री
सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा
पॅपराजींनी राजू यांच्या निधनावर तापसीला विचारला प्रश्न; भडकलेली अभिनेत्री म्हणाली, ‘बाजूला व्हा रे…’