Friday, February 3, 2023

‘झलक दिखला जा’च्या सेटवर शिल्पाने मांडल्या वेदना, माधुरीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली अभिनेत्री

छाेट्या पडद्यावरील लोकप्रिय शाे ‘झलक दिखला जा’ सतत चर्चेत असताे. प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटी कंटेस्टेंट एका विशेष थीमवर परफॉर्मन्स करतात आणि आपल्या डान्सने परीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा जबरदस्त मनाेरंजन करतात. अशातच यावेळी एपिसोड थीम कुटुंबावर आधारित हाेती. एपिसाेडमध्ये कंटेस्टेंट शिल्पा शिंदे ढसाढसा रडताना दिसली. शिल्पाने आपल्या कुटुंबाची कहाणी सांगत माधुरी दीक्षित हिला मिठी मारली आणि भावूक झाली.

शिल्पा (Shilpa Shinde) हिने कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील दु:खी व्यथा मांडली आहे. तिने आपल्या करिअरच्या कठीण प्रवासाबद्दल सर्वांना सांगितले. यासोबतच कुटुंबाकडून साथ न मिळाल्याचे दु:खही सांगितले.

शिल्पाने ‘झलक दिखला जा’ (Jhalak dikhhla jaa) या शाेमध्ये तिच्या अभिनय करण्याच्या निर्णयावर आई आणि बहिणीचा सपाेर्ट नसल्याचा खुलासा केला. शिल्पाने सांगितले, “मला माझ्या आई आणि बहिणीने वेडी म्हटले हाेते.” शिल्पाने पुढे सांगितले की, “जेव्हा ती ‘बिग बाॅस’ जिंकली त्यावेळीही तिच्या आईने तिला प्रोत्साहित केले नाही.” हे सागंताना शिल्पा भावूक झाली. त्यानंतर माधुरी दीक्षित (Madhuri dixit) हिने शिल्पाचे सांत्वन करत तिला मिठी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यावर शिल्पा शिंदेने सांगितले, “मला सहानुभूतीची गरज नाही, मला फक्त अशा लोकांना प्रोत्साहित करायचे आहे, जे एकटे पडले आहेत. मी फक्त ते शेअर करू इच्छिते जे मी अनुभवले आहे.” शिल्पा तिच्या कुटुंबातील मतभेद सर्वांसोबत शेअर करत म्हणाली, “माझ्या कुटुंबाने मला साथ दिली नाही, मी एकटीनेच माझा मार्ग निवडला.”

त्याच वेळी, ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये उपस्थित असलेल्या करण जोहरने देखील त्याचा पालकांसोबत असलेला बाँड शेअर केला. करण म्हणाला की, “मी खूप भाग्यवान आहे की, मला असे पालक मिळाले ज्यांच्याशी मी माझ्या करिअरबद्दल चर्चा करू शकलो.” करणने सांगितले की, “काही वेळा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींमुळे आपल्याला खूप त्रास होतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की, तरुणांची स्वतःचा विचार आहे. त्यामुळे आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करुया.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, शिल्पा शिंदेला काम नसल्यामुळे ती लाईमलाईटपासून दूर होती. तरीदेखील तिने काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने 2002 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, तिला प्रसिद्धी मिळाली ते टीव्ही मालिका ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेतून. तिने ‘भाभी’, ‘कभी आये ना जुदाई’, ‘संजीवनी’, ‘आम्रपाली’, ‘मायका’ यांसारख्या दमदार मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा
पॅपराजींनी राजू यांच्या निधनावर तापसीला विचारला प्रश्न; भडकलेली अभिनेत्री म्हणाली, ‘बाजूला व्हा रे…’
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून

हे देखील वाचा