प्रत्येकाच्या नावापुढे आडनाव हे असतेच. नावाप्रमाणे आडनावाचे देखील प्रचंड महत्त्व मानले जाते. कारण आपली ओळख ही केवळ आपल्या नावानेच केली जाते असे नाही. अनेकांची नावे सारखीच असतात. त्यामुळे आडनावाची उत्पत्ती झाली आहे. असाच तुमचा देखील समज असेल ना? परंतू असे नाही. हा विचार पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. कारण मराठी कालाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कधीही आपल्या नावापुढे आडनाव लावले नाही. चला तर मग या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
रसिका सुनील (Rasika Sunil)
झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ होय. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलेसे केले. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतच. पण या मालिकेतील प्रेक्षकांचे सर्वाधिक मनोराजन करणारी आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील होय. रसिका सुनील देखील तिच्या नावापुढे आडनाव लावत नाही. तर ती तिच्या नावापुढे तिच्या वडिलांचे नाव लावते. तिच आडनाव धाबडगावकर असे आहे.
अमृता सुभाष (Amruta Subhash)
अभिनेत्री अमृता सुभाषने मराठी आणि बॉलिवूड विश्वात देखील आपले नशीब आजमवले आहे. तिने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला आहे. ही अभिनेत्री देखील तिच्या नावापुढे तिचे आडनाव लावत नाही. ती तिच्या वडिलांचे नाव तिच्या नावापुढे लावते. अमृताचे आडनाव ढेंबरे असे आहे.
सायली संजीव (Sayali Sanjeev)
झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव तर तुम्हाला आठवतच असेल. तिने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. ही अभिनेत्री देखील तिच्या नावापुढे आडनाव लावत नाही. तर ती तिच्या नावापुढे वडिलांचे नाव लावते. तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसारकर आहे.
ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)
मराठी कलाविश्वातील नावाजलेले नाव आणि लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा ललित प्रभाकर होय. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवत त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. ललित देखील त्याच्या वडिलांचे नाव त्याच्या नावापुढे लावतो. त्याचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्याशी भेट झाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’बद्दल लिहिले…
‘तरुण भारत तयार होतो’ टाईम मासिकावर झळकल्यानंतर दीपिका पदुकोणचे भारताबद्दलचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत