[rank_math_breadcrumb]

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे.

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यासह कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हे सरप्राईजही आता समोर आले असून यात सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील ही तगडी स्टारकास्ट पाहाता हा सिनेमा पुन्हा एकदा बॅाक्स ॲाफिस गाजवणार, हे नक्की ! संजय जाधव या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.

अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर निर्माते असून निनाद नंदकुमार बत्तीन, वर्डविझर्ड एंटरटेंनमेट सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एव्हीके पिक्चर्स आणि उदाहरणार्थने वर्डविझर्डसोबत हातमिळवणी केली असून हे आणखी दोन चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ” आज बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन आम्ही फ्लोअरवर उतरत आहोत. यात अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते, ओंकार माने यांची साथ लाभल्याने हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनेल, याची खात्री आहे. चित्रपटातील कलाकार तर कमाल आहेतच. यात काही नवीन कलाकार या कुरळे ब्रदर्सच्या कुटुंबात सहभागी झाल्याने ही धमाल आता आणखी वाढणार आहे. आता नवीन जोमाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.’’

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

अभिनेता सिद्धार्थ जाधवला ऑफर झाला होता तुंबाड सिनेमा; हि महत्त्वाची भूमिका साकारणार होता अभिनेता…

 

author avatar
Tejswini Patil