Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ जाधवला ऑफर झाला होता तुंबाड सिनेमा; हि महत्त्वाची भूमिका साकारणार होता अभिनेता…

अभिनेता सिद्धार्थ जाधवला ऑफर झाला होता तुंबाड सिनेमा; हि महत्त्वाची भूमिका साकारणार होता अभिनेता…

२०१८ साली आलेला तुंबाड हा सिनेमा आज खूप पसंत केल जातो. सिनेमा रिलीज झाला त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कमाई तर चांगली केली परंतु जसा मिळायला हवा होता तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पुढे ओटीटी वर आल्यानंतर चित्रपट लाखो लोकांनी पाहिला आणि चित्रपटाला क्लासिकचा दर्जा मिळाला.

या सिनेमातील सर्वच पात्रे प्रेक्षकांना आवडली होती. हस्तर हि भीतीदायक भूमिका देखील प्रेक्षकांनी खूप पसंत केली होती. अभिनेता सिद्धार्थ जाधव याला सर्वप्रथम हि भूमिका ऑफर करण्यात आली होती. 

सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीत सांगितले की, ‘’तुंबाड सिनेमासाठी मी २००३ साली ऑडीशन दिली होती. दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी मुंबईतील व्यायाम मंदिरात हि ऑडीशन घेतली होती. तिकडे मी त्याला हस्तर सारखं चालून दाखवलं होतं. नंतर त्याने स्पेशल इफेक्ट्स द्वारे हस्तर अजून घाणेरडा केला, मी मात्र तेव्हा तसाच होतो आणि तसाच दिसायचो.

मला त्यावेळी अंडरवियर घालायला दिली होती. त्याला एक पिशवी बांधली होती. तो मला म्हणाला कि मला वेगवेळ्या पद्धतीने चालून दाखव. मला तेव्हा कळलंच नाही की हे काय आहे. काही सिनेमांत कलाकारांना कळतं की हा चित्रपट वेगळा आहे. त्यानंतर काही वर्षांनी त्याने हा सिनेमा केला’. 

तुंबाड आता सहा वर्षांनी पुन्हा रीलीज करण्यात आला आहे. आताही तुंबाडला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सोहम शाह याने हा सिनेमा निर्मित केला आहे. त्यानेच विनायकराव हि मुख्य भूमिका केली आहे. या पुन्हा केलेल्या प्रदर्शनाबरोबरच निर्मात्यांनी तुंबाड भाग दोनचीही अधिकृत घोषणा केली आहे.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

2 नाहीतर 3 मुलांचा बाप आहे गोविंदा; या कारणामुळे एका मुलीचा झाला मृत्यू

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा