‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जोडी म्हणजे राणादा आणि पाठक बाई. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर हिने या मालिकेत पाठक बाईंची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान मिळवले आहे. तर राणादाचे पात्र अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती. या प्रसिद्ध जोडीने खऱ्या आयुष्यात देखील लग्न केले आहे. ते सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधरला तिच्या नवऱ्याने भेट म्हणून एक महागडी वस्तू दिली आहे.
हार्दिक जोशीने (Hardik Joshi) अक्षयाला आयफोन 15प्रो मॅक्स भेट दिला आहे. अक्षयाने सोशल मीडियावर या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आयफोन 15 प्रो मॅक्ससोबत दिसत आहे. फोटो शेअर करत अक्षयाने लिहिले, “माझा प्रिय हार्दिक, तुझ्याकडून मिळालेला हा आयफोन 15प्रो मॅक्स मला खूप आवडला आहे. तुझ्या प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद.”
या फोटोवर अक्षयाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अक्षयाला आयफोन भेट दिल्यामुळे हार्दिकचे कौतुक केले आहे. अक्षया आणि हार्दिक यांनी गेल्या वर्षी 2 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. या मालिकेत दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नगाठ बांधली.
View this post on Instagram
अक्षया आणि हार्दिक सध्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका संपल्यानंतर आपलं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. हार्दिक सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत शुभंकर ही भूमिका साकारत आहे. (Marathi famous actor Hardik Joshi gifted iPhone 15 Pro Max to his wife Akshay)
आधिक वाचा-
–कमाईच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या सनीने ‘या’ कारणामुळे घेतला होता दोन अभिनेते असलेले सिनेमे न करण्याचा निर्णय
–‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाचं रॉयल फोटोशूट, लूक पाहून नेटकरी फिदा