Thursday, June 13, 2024

अक्षया देवधरने रोमँटिक फोटो शेअर करत पतीसाठी लिहिली खास पोस्ट, एक नजर टाकाच

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. 6 ऑक्टोबरला हार्दिक त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अक्षयाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हार्दिकबद्दल आपली भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या अक्षयाची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

अक्षयाने (Akshaya Deodhar) पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा मित्र, माझा प्रियकर आणि आता माझा नवरा आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खूप आनंददायी आहे. तुझ्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यासोबत आयुष्यभर एकत्र राहायचे आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

तसेच तिने पुढे लिहिले की, “गेल्या 7 वर्षांपासून आपण एकमेकांबरोबर आहोत पण, आपल्या पहिल्या भेटीत आणि आजच्या दिवसात खूप फरत आहे. तो फरक म्हणजे आपल्यातील प्रेमआहे.” हार्दिक आणि अक्षयाने 2022 मध्ये पुण्यात थाटामाटात लग्न केले होते. दोघेही छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हार्दिक आणि अक्षयाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रेम दिले आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर हार्दिक जोशीने कमेंट करताना लिहिले की, “आय लव यू.” तर अभिज्ञा भावेचा पती मेहुलने कमेंट करताना लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला वाटतं आपण प्लॅन करून कोल्हापुरला भेटायला हवं.” अनेक जण यावर कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (Akshaya Deodhar shared a romantic photo and wrote a special post for her husband Hardik Joshi)

आधिक वाचा-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने छेडखोरांना दिला चोप; म्हणाली, ‘पोरांना धुतलंय…’
ऑफ-शोल्डर डिझायनर ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचा झक्कास लूक; पाहा फोटो

हे देखील वाचा