Saturday, July 27, 2024

अखिल भारतीय मराठी सिनेसृष्टीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, झाली ‘या’ पदावर नेमणूक

अखिल भारतीय चित्रपट संघाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांचा गुरुवारी (२५ नोव्हेंबर) रोजी वाढदिवस साजरा झाला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणी या बहुविध सेवा संस्थेतर्फे कलावंत रोजगार मेळाव्याचे विशेष आयोजन केले होते. यानिमित्त त्यांच्यासाठी एक खास घोषणा देखील केली आहे. मेघराज राजे भोसले यांची फिल्म फेडरेशनच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार केला गेला आहे.

मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, कामगार चित्रीकरणासाठी विविध सेवा पुरवणारे सेवा पुरवठादार या सर्व स्नेही जणांचा मेळावा आयोजित केला होता. हा समारंभ गुरुवारी (२५ डिसेंबर ) सायंकाळी महावीर जैन महाविद्यालय, पुणे येथे पार पडला आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Marathi film industry President meghraj raje bhosale Appoint as a film federation vice President)

मेघराज राजे भोसले यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७४ साली इंदापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या गावावरून डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन पुण्यात आले. अगदी शून्यातून त्यांनी त्यांच्या या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी लोककलांचा शहरी भागात परिचय करून देण्याचा निर्णय घेतला आणि ‘पांडव एंटरप्राइजेस’ नावाची संस्था स्थापन केली. काही वेळातच त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

ते अखिल भारतीय मराठी चित्रपटसृष्टीचे अध्यक्ष असण्यासोबतच ते एक निर्माते आणि अभिनेते देखील आहेत. त्यांनी २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ तिथे खाऊ’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी ‘मास्तर एके मास्तर’ आणि ‘दणक्यावर दणका’ या चित्रपटांची निर्मिती केली. यासोबतच त्यांचा २०२२ मध्ये ‘सनकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा