Friday, March 13, 2026
Home मराठी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळे अडकला विवाह बंधनात; पाहा नव्या जाेडीचे फाेटाे

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळे अडकला विवाह बंधनात; पाहा नव्या जाेडीचे फाेटाे

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे हा जळगावच्या मोनिका महाजनसोबत लग्न बंधनात अडकला आहे. बुधवारी (दि. 14 डिसेंबर)ला सांगोला येथे सुमित आणि मोनिका यांचा लग्नसोहळा पार पडला. सुमितला कलाकारांनी आणि चाहत्यांनी लग्नानिमित्त भरभरुन शुभेच्छा दिल्यात. सुमित आणि मोनिका यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून मिळाली लाेकप्रियता
सुमित पुसावळे (sumit pusavale) याने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये ‘लागीर झालं जी’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ यासारख्या मालिकांचा समावेश आहे. मात्र, सुमितला खरी ओळख मिळाली ती ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून. ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच भरभरुन मनाेरंजन करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सुमिकने प्रीवेडिंगचे शेअर केले फाेटाे
यापूर्वी सुमितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर प्रीवेडिंगचे फोटो तसेच व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फाेटाे शेअर करताना सुमितने कॅप्शनमध्ये लिहिले,”उनका हात पकडना तो एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था.” या फाेटाेनंतर सुमित लग्न बंधनात अडकल्याची चर्चा साेशल मीडियावर रंगू लागली हाेती. अखेर बुधवारी (दि. 14 डिसेंबर)ला सुमित माेनिकासाेबत विवाह बंधनात अडकला.

या दोघांचा लग्नसाेहळा धुमधडाक्यात पार पडला. अभिनेत्याच्या लग्न साेहळ्यात सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच कुटुंबातील सदस्यानी हजेरी लावली होती. तर अनेक मराठी कलाकारांनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (marathi `serial balumama fame actor sumit pusavale got stuck in marriage see exclusive photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘पठाण चित्रपट लावतील, ती चित्रपटगृहे जाळून टाका…’, अयोध्येतील महंतांची संतप्त प्रतिक्रिया

कंगनाने बहिणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची सांगितली व्यथा, घटना वाचून तुम्हचाही उडेल थरकाप

हे देखील वाचा