Thursday, November 30, 2023

‘पठाण चित्रपट लावतील, ती चित्रपटगृहे जाळून टाका…’, अयोध्येतील महंतांची संतप्त प्रतिक्रिया

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी ‘पठाण‘ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दीपिकाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. प्रेक्षकांना तो खूप आवडला असला तरी काही लोकांना दीपिका पदुकोणचा हा लूक आवडला नाही. अशा परिस्थितीत हे प्रकरण आता राजकीय वर्तुळात पोहोचले आहे. दीपिकाच्या बिकिनी लूकचा अनेक ठिकाणी तीव्र विरोध होत आहे. मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने इशारा दिला होता की, ‘पठाण’चे काही सीन आणि दीपिकाचे कपडे बदलले नाहीत, तर चित्रपट त्या राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. अशातच आता अयोध्यातील महंत राजू दास यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अयाेध्यातील महंत राजू दास ( mahant raju das) पुढे म्हणाले, “बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट सातत्याने सरास धर्माची खिल्ली उडवतात. तसेच, देवी-देवीतांचे अपमान करण्याचे कायमच मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) हिने भगव्या रंगाची बिकिनी घालून संतांच्या आणि देशाच्या प्रचंड भावना दुखावल्या आहेत. सनातन धर्माची अभिनेता शाहरुख (shahrukh khan) सतत खिल्ली उडवतो. भगव्या रंगाची बिकिनी घालून अशा गाण्यात नाचण्याची काय गरज होती?,” असा प्रश्न महंतानी चित्रपट निर्माता आणि कलाकारांना विचारला आहे.

महंतांनी आपला मुद्दा पुढे करत म्हणाले, “धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे मुद्दाम करण्यात आले. या कलाकारांवर कठोर शिक्षा देण्यात यावी. मी प्रेक्षकांना ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतो. ज्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित केला जाईल, तेथील सिनेमागृह जाळून टाकावीत,” असे मत महंतांनी मांडले आहे.

‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतत आहे. (fire pathaan movie will be screened say mahant raju das over saffron costumes ssa )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सोनू सूदच्या भलेपणाला खबी लामेने दिली खरी शिकवण, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

कंगनाने बहिणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची सांगितली व्यथा, घटना वाचून तुम्हचाही उडेल थरकाप

हे देखील वाचा