Friday, March 29, 2024

कंगनाने बहिणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची सांगितली व्यथा, घटना वाचून तुम्हचाही उडेल थरकाप

बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत स्पष्ट वक्ते म्हणुन ओळखली जाते. ती आपले मत अशा प्रकारे मांडते की, नाव न घेता समाेरच्यावर निशाना साधते. मात्र, अलीकडेच मंगळवारी (दि. 13 डिसेंबर)ला दिल्लीतील द्वारका येथे 17 वर्षीय तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्यानंतर कंगना राणौतचे हृदय हादरले आहे. अभिनेत्रीला तिच्या बहिणीसोबत घडलेली एक अत्यंत क्लेशकारक घटना आठवली, ज्यानंतर तिने त्या वेळी वाटलेली भीती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

कंगना रणौत (kangana ranaut) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टाेरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिची बहीण रंगोली चंदेल ( rangoli chandel) हिच्यावर ऍसिड हल्ला केलेले दिवस अभिनेत्री आठवले. यासोबतच या अपघातानंतर अभिनेत्रीने तिची भीतीही चाहत्यांना सांगितली. कंगनाने सांगितले की, “प्रत्येक वेळी जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती तिच्याजवळून जात असे तेव्हा ती आपला चेहरा झाकायची.”

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोली चंदेल हिच्यावर एका रोमियोने रस्त्याच्या कडेला अॅसिड फेकले होते, ज्यासाठी तिला 52 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. एवढेच नाही, तर तिला मानसिक आणि शारीरिक आघातही झाला होता. आम्ही एक कुटुंब म्हणून पूर्णपणे तुटलो होतो. मला थेरपी देखील करावी लागली. कारण, मला भीती वाटत होती की, तेथून जाणारे कोणी माझ्यावर ऍसिड फेकतील. काेणतीही बाईक किंवा कार माझ्या बाजूने गेली, तर मी लगेचच माझा चेहरा झाकून घ्यायची. मात्र, हे अत्याचार थांबले नाहीत. सरकारने या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मी गौतम गंभीरशी सहमत आहे, आपम अ‍ॅसिडविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे हल्लेखोरांवर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

kangana ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

रांगोली आता विवाहित आहे आणि तिला पृथ्वीराज हा 5 वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकदा अभिनेत्यासोबत चित्रपट कार्यक्रम आणि स्क्रीनिंगमध्ये जाते. हल्ल्याच्या वेळी ती 21 वर्षांची होती आणि ती थर्ड डिग्री भाजली होती. कंगनाने खुलासा केला होता की, “रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती, एक कान वितळला होता आणि एका स्तनाला गंभीर जखम झाली होती.”

ही घटना मंगळवारी (दि. 13 डिसेंंबर)ला घडली. दिल्लीतील द्वारका येथे दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी बारावीच्या विद्यार्थ्यांनीवर अॅसिड फेकले. 17 वर्षीय मुलागी शाळेसाठी घरून निघाली होती. वृत्तानुसार, मुलगी आठ टक्के भाजली असून तिच्यावर सफदरजंग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. (bollywood actre`s`s kangana ranaut shared her fear she experienced after acid attack on sister rangoli chandel)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
स्वत: शाहरुखने अक्षयसोबत चित्रपट न करण्याचे सांगितले कारण; म्हणाला, ‘कधीच भेटणार नाहीत…’

सोनू सूदच्या भलेपणाला खबी लामेने दिली खरी शिकवण, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा