Tuesday, June 24, 2025
Home कॅलेंडर अरे वा! गायिका कार्तिकी गायकवाडला वडिलांकडून मिळाले लग्नाचे ‘हे’ महागडं गिफ्ट

अरे वा! गायिका कार्तिकी गायकवाडला वडिलांकडून मिळाले लग्नाचे ‘हे’ महागडं गिफ्ट

सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाड मागच्याच महिन्यात विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर कार्तिकी पुण्याची सून झाली आहे. रोनित पिसे असे कार्तिकीच्या पतीचे नाव आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.

कार्तिकीचे लग्न अगदी राजेशाही थाटात पुण्यात संपन्न झाले. कार्तिकीला तिच्या लग्नासाठी सर्वच लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले. तिला तिच्या अनेक फॅन्सकडून वेगवेगळे गिफ्ट्स देखील मिळाले.

कार्तिकीने लग्नात तिच्या वडिलांनी तिला काय गिफ्ट दिले याचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. कार्तिकीच्या वडिलांनी त्यांच्या लाडक्या लेकीला लग्नात मर्सिडीज ई क्लास लक्झरी कार गिफ्ट केली आहे. कार्तिकेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गिफ्ट कारचा फोटो शेयर केला आहे.

हा फोटो शेयर करत तिने लिहिले, ” बाबांनी मला आणि रोनितला दिलेली ही भेट”. कार्तिकीने शेयर केलेल्या या फोटोमध्ये ती, रोनित, तिचे बाबा आणि तिचे दोन्ही भाऊ दिसत आहे. या गाडीची किंमत काही लाखांत आहे.

कार्तिकेने तिच्या लग्नानंतर पहिला संक्रांत सण साजरा केला आहे. हा सण साजरा करतानाचे अनेक फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेयर केले आहे. कार्तिकेने काळ्या रंगाची साडी नेसली असून, त्यावर हलव्याचे या दागिने घातले आहे. कार्तिकी तिच्या या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत असून सोशल मीडियावरही तिच्या या फोटोना भरपूर लाईक्स मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CKCKe_2gD5W/?utm_source=ig_embed

कार्तिकीचे सासरे हे तिच्या वडीलांचे जुने मित्र आहेत. त्यांनी कार्तिकी आणि रोनित यांच्या पत्रिका बघून, बघण्याचा वगैरे कार्यक्रम केला आणि तिचे रीतसर अरेंज्ड मॅरेज झाले.

हे देखील वाचा