झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदेही सर्वांनाच आठवत असेल, माहिती असेल नाही का? हो हो तीच ती अभिनेत्री, जिने आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना जणू आपल्या प्रेमातच पाडले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे ‘ऋता दुर्गुळे.’ ऋता आपल्या सुंदरतेने भल्या भल्या अभिनेत्रींनाही मागे टाकते. इतर कलाकारांप्रमाणे आपल्या आयुष्यातील चांगल्या- वाईट गोष्टी ती सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामधील तिच्या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
कोरोना व्हायरस अद्याप संपुष्टात आलेला नाही. अशामध्ये सर्व कलाकार वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत आहेत. तोंडाला मास्क लावत आहेत. परंतु ऋताने शेअर केलेल्या फोटोत तिने तोंडाला कपडा बांधलेला दिसत आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ऋताचे २ मिलीयनपेक्षाही अधिक फॉलोवर्स झाले आहेत. तिने फोटो शेअर करत तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिने “आपनं आपनं हाय!!! जसा हाय तसा हाय!!! आज २.२ मिलीयन लोग आपले भिडू आहेत त्या सर्वांचे दिलाच्या देठापासून थॅन्क्यूज!!! – पालवी,” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी धडाधड लाईक्स आणि कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.
यापूर्वीही ऋताने भन्नाट फोटो शेअर केले आहेत.
ऋताने सन २०१३ मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिने जेव्हा अभिनयाला सुरुवात केली, तेव्हा ती १८ वर्षांची होती. यानंतर तिने सन २०१७ साली ‘फुुलपाखरू’ मालिकेत काम केले. ही मालिका तब्बल २.५ वर्षे चालली. या मालिकेतील तिचा अंदाज अन् सुंदरता चाहत्यांना खूपच आवडली होती.
याव्यतिरिक्त तिने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकामध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ
-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात
-…अन् कॉमेडीअन सुनील ग्रोव्हरच्या घरात झाली दह्याची चोरी, माकडाने असा साधला डाव