या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अनेकांनी पूर्व कल्पना देऊन त्यांच्या आयुष्यातील हा क्षण त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला, तर काहींनी मात्र अचानक लग्न झाल्याची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यातील एक अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिका सुनील मागील अनेक दिवस तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत डेट करत होती. ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत, अशा बातम्या देखील येत होत्या. परंतु त्या दोघांनी कोणालाही न सांगता ऑक्टोबर महिन्यात गोव्याच्या किनारी सात फेरे घेतले.
त्यांनी लग्नानंतर १५ दिवसांनी त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर अधिकृत केली. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मोजक्याच मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार केला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी आदित्य आणि रसिका त्याच्या हनीमूनला मालदीवला गेले आहेत. तेथील अनेक फोटो सोशल मीडिया त्यांनी शेअर केले आहेत. (Actress Rasika sunil share Maldives photo on social media)
रसिकाने तिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. नुकतेच तिने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने केवळ शर्ट घातला आहे. तसेच शर्टची वरची दोन बटणे खुली ठेवली आहेत. तिने डोळ्यांवर गॉगल लावला आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच कूल दिसत आहे.
अनेकांना तिचा हा लूक आवडला मात्र अनेकजण तिला या फोटोवरून ट्रोल करत आहेत. एकाने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे की, “आदित्यचा शर्ट ना, तो तू ढापला आहे ना!” तसेच आणखी एकाने लिहिले आहे की, “पँट घालायला विसरली का?” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा