मराठी चित्रपटसृष्टीतून जणू काही आनंदाच्या बातम्यांचा पाऊसच पडत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री अभिज्ञा भावेने उद्योजक मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लग्नबंधनात अडकला. त्यानंतर अभिनेत्री धनश्री काडगावकरने मुलाला जन्म दिला. आता अशीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर बाबा झाला आहे.
मंगळवारी (२ मार्च) आरोहच्या घरी गोंडस बाळाचे धडाक्यात आगमन झाले. त्याने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
आरोहने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये हत्तीचा लोगो दिसत असून त्याच्यावर ‘इट्स अ बॉय’ असे लिहिले आहे.
त्याने या पोस्टला ‘Yaaasss!’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.
नुकतेच त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. यादरम्यानचेही फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.
आरोहने आपली जुनी मैत्रीण अंकिता शिंघवीसोबत ३ वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यांची भेट कॉलेजमध्ये झाला होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढू लागली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
आरोहच्या चित्रपट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यामधील त्याचा अभिनय पाहून त्याला पुढील ‘घंटा’ या चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. त्याने दोन्हीही चित्रपटाधील आपल्या जबरदस्त अभिनयाने माध्यमांचे लक्ष वेधले होते.
आरोहने ‘प्रेम हे’, ‘गुलमोहर’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘बिग बॉस मराठी सिझन २’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तो सध्या ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स
-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग
-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा