Wednesday, July 3, 2024

‘मास्टरशेफ इंडिया’ शोला मिळाला अंतिम विजेता ‘या’ स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरत मिळवले २५ लाखांचे बक्षीस

मागील तीन महिन्यांपासून टेलिव्हिजनविश्वात एक शो तुफान गाजत होता, आणि तो म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’. या लोकप्रिय कुकिंग शोचा नुकताच ग्रँड फिनाले संपन्न झाला. तब्बल ६४ भागांच्या प्रतीक्षेनंतर या शोला त्यांचा विजेता मिळाला आहे. अंतिम फेरीत सांता सर्मा, सुवर्णा बागुल आणि नयनज्योती सैकिया हे तीन स्पर्धक इतर स्पर्धकांना मोठी टक्कर देत पोहचले. या तिघांमधून नयनज्योती सैकियाने बाजी मारत शोचे जेतेपद मिळवले.

मास्टरशेफ इंडियाच्या अंतिम फेरीसाठी अनुभवी, लोकप्रिय, प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच शेफ रणवीर ब्रार, शेफ विकास खन्ना आणि शेफ गरिमा अरोरा देखील होते. अंतिम फेरीसाठी या तीन स्पर्धकांना १२० मिनिटांमध्ये “सिग्नेचर थ्री-कोर्स मील” बनवण्याचे आव्हान दिले होते. तीन महिन्यांच्या प्रवासात आलेल्या अनुभवांच्या जोरावर आणि विशेष म्हणजे चवीच्या जोरावर फायनल कोर्स मीलचे चॅलेंज पूर्ण करून नयनज्योती या शोचा अंतिम विजेता ठरला.

नयनज्योतीला बक्षीस काय मिळाले?
नयनज्योतीला बक्षीस म्हणून ‘मास्टरशेफ इंडिया’ची प्रतिष्ठित ट्रॉफी, गोल्डन शेफचा कोट आणि तब्बल २५ लाख रुपयांचा चेक नयनज्योतीला देण्यात आला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आसाममधील सांता सर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल प्रत्येकी पाच लाखांचे चेक आणि मेडल देण्यात आले.

दरम्यान नयनज्योती आसामचा राहणारा असून, त्याला मास्टरशेफ मध्ये सर्वात जास्त गोड पदार्थ बनवण्यासाठी वाहवाई मिळाली. सोबतच इतर पदार्थ देखील तो उत्तम बनवतो. केवळ २७ व्या वर्षी त्याने ही उपलब्धी मिळवल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नयनने कोणत्याही प्रकारचे जेवण बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसून, त्याने स्वतःहून ते अवगत केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा