Wednesday, July 3, 2024

एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे त्याला बघण्यासाठी लोकांनी केली तोबा गर्दी, गेट फोडून आत घुसण्याचा झाला प्रयत्न

बिग बॉस १६ चे जेतेपत पटकावल्यानंतर एमसी स्टॅन हे नाव घराघरात पोहचले. रॅपर असणाऱ्या स्टॅनला या शोने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो देशातल्या सर्वात लोकप्रिय रॅपरच्या गणतीमध्ये येतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्टॅनने त्याचे देशातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट सुरु केले आहेत. नुकताच त्याचा हैद्राबादमध्ये एक कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमधे तुफान गोंधळ उडाला. त्याच्या कॉन्सर्टमधे जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त लोकं उपस्थित होते. त्याने त्याच्या दमदार परफॉर्मन्सने सगळ्यांनाच खुश केले. एवढे लोकं पाहून स्टॅन देखील काही काळ गोंधळ की त्याचे एवढे फॅन्स आहेत.

नुकत्याच झालेल्या या कॉन्सर्टमधे सगळीकडे फक्त एमसी स्टॅन हेच नाव ऐकू येत होते. त्याच्या कॉन्सर्टसाठी गाचीबोवली स्टेडियम खचाखच भरले होते. १० मार्च रोजी झालेल्या या कॉन्सर्टमधे त्याने अनेक सॉंग्स परफॉर्म केले. यात त्याने त्याचे काही जुने गाणे मिक्स करून देखील सादर केले. रॅप आणि हिपहॉप यांना एकत्र करून त्याने एक वेगळेच म्युझिक तयार केले ज्यामुळे प्रेक्षक अधिक खुश झाले.

यावेळी एमसी स्टॅनला बघण्यासाठी एकच गोंधळ उडाला. अनेकांनी तर गेट पडून आत घुसण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी एमसी त्याच्या स्ट्रीट लूकमध्येच दिसला. एमसी स्टॅनचा सध्या ‘इंडिया टूर’ या अंतर्गत विविध कॉन्सर्ट सुरु आहेत. याआधी त्याने पुण्यात एक कॉन्सर्ट केला होता. ७ मे रोजी त्याचा देखील कॉन्सर्ट होणार आहे. बिग बॉसमध्ये त्याने तब्बल १७ मिलियन मत मिळवत हा शो जिंकला. लवकरच स्टॅन त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हज यात्रेला घेऊन जाणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड असणाऱ्या सबा आझादला ट्रोल

शालेय दिवसांमध्ये श्रद्धा करायची परिक्षेत चीटिंग? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

हे देखील वाचा