बिग बॉस १६ चा विजेता बनल्यानंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. पूर्वी काही विशिष्ट लोकांनाच माहित असलेला एमसी स्टॅन आता जगभरात ओळखला जात आहे. रॅपर एमसी स्टॅनसोबत बिग बॉसचा विजेता ही त्याची आता नवीन ओळख बनली आहे. शो संपल्यानंतर एमसी स्टॅन सतत चर्चेत असून, मीडियामध्ये देखील तो गाजताना दिसत आहे. रोजच्या त्याच्याशी संबंधित बातम्या आणि माहिती झळकत आहे. आता बिग बॉसचा अंतिम सोहळा पार पडून बरेच दिवस झाले असले तरी एमसी स्टॅन काही जुना झालेला नाही.
एमसी स्टॅनने शो जिंकल्यानंतर विविध गोष्टींमध्ये तो सतत गाजत आहे. त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत नवनवीन रेकॉर्ड देखील केले आहेत, आणि अजूनही करत आहे. आता पुन्हा एकदा एमसीने असे रेकॉर्ड बनवले आहे, ज्यामुळे त्याने बॉलिवूडच्या दिग्गज महारथींना मागे टाकले आहे. यात शाहरुख, सलमानसोबतच विराट कोहलीचा देखील समावेश आहे. आता एमसीने असे रेकॉर्ड केले आहे, जे भल्याभल्याना देखील करणे एवढे सोपे नसते. सोशल मीडियावर ट्रेंड करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तो टॉपला गेला आहे.
View this post on Instagram
एका फॅन पेजच्या दाव्यानुसार एमसी स्टॅनने म्युझिक इंडस्ट्रीमधील सर्वच दिग्गजांना मागे टाकत सर्वात जास्त ऐकणारा गायक म्हणून नाव नोंदवले आहे. एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “२३ वर्षाच्या वयात एमसी स्टॅनने इतिहास रचला आहे. एमसी स्टॅन भारतातील सर्वात आवडता आणि सर्वात जास्त ऐकले जाणारे अरिजीत सिंग, नेहा कक्कर, ए आर रहमान, जुबिन नौटियाल आदी गायकांना मागे टाकत गुगल ट्रेंडनुसार सर्वात लोकप्रिय गायक बनला आहे.” एमसी स्टॅन ट्विटरवर देखील ट्रेंड करत आहे. त्याच्या ‘इन्सान’ या गाण्याला एका वर्षात १० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
पुण्याच्या राहणाऱ्या अल्ताफ शेख उर्फ एमसी स्टेनचा बिग बॉसचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेकदा अशी वेळ आली जेव्हा स्टॅनने हार मानत शो मधून बाहेर येण्याबद्दल देखील म्हटले होते. एवढेच नाही तर तो मधेच शोमधून बाहेर यायला देखील तयार होता. तो सतत स्वतःला डिप्रेस म्हणत होता. मात्र शेवटी त्याने हिंमतीने घेतले आणि खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या लोकप्रिय शब्दासोबतच खऱ्या व्यक्तिमत्वापर्यंत सर्वच गोष्टींना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. याचमुळे तो विजेता ठरला. सध्या एमसी त्याच्या कॉन्सर्ट्समध्ये व्यस्त आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ