×

मी होणार सुपरस्टारच्या विजेतेपदावर शुद्धी कदमने कोरले नाव

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ हा गायनाचा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही अभूतपुर्व असा प्रतिसाद पाहायला मिळाला. आता या कार्यक्रमाचा अंतिम सोहळाही पार पडला असून या कार्यक्रमाच्या विजेतेपदाची माळ शुद्धी कदमच्या गळ्यात पडली. या महा अंतिम सोहळ्यात राजयोग धुरी, शुद्धी कदम, सिद्धांत मोदी राधिका पवार आणि सायली टाक यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या विजेतेदावर आपले नाव कोरल्यानंतर शुद्धी कदमवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ती सुद्धा भावूक झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे अशीही प्रतिक्रिया दिली. महाअंतिम सोहळ्यात तिने केलेले सादरीकरण आणि प्रेक्षकांची तसेच परिक्षकांची जिंकलेली मने यांमुळेच तिची  या विजयासाठी निवड झाली. याबद्दल बोलताना तिने या मंचावर मला सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्यासारखे गुरू मिळाले आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्पर्धेच्या अंतिम भागात फक्त विजेतीच नाही तर प्रत्येक स्पर्धकाने यासाठी जिवतोड मेहनत घेतली होती. एकापेक्षा एक रंगतदार गाण्यांनी कार्यक्रमात धमाल केलेली पाहायला मिळाली. त्यासोबतच या कार्यक्रमात स्टार प्रवाहमधील अनेक परिवारही सहभागी झाले होते. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच सौंदर्य प्राप्त  झाले होते. कार्यक्रमात उपस्थित या पाहुण्यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन करत त्यांच्यासोबत  धमाल उडवलेली पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post