Tuesday, June 30, 2026
Home बॉलीवूड पहिलं घर घेण्याचं स्वप्न फराह खान, शाहरुख खानमुळे झालं होत पूर्ण

पहिलं घर घेण्याचं स्वप्न फराह खान, शाहरुख खानमुळे झालं होत पूर्ण

फराह खान ही एक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट निर्मातीकार आणि नृत्यदिग्दर्शिका आहे. ती सध्या तिच्या व्लॉग्समुळे जास्त चर्चेत आहे. तिचा स्वयंपाकी दिलीप याच्यासोबत ती अनेकदा चाहत्यांना सेलिब्रिटींच्या घरांची झलक दाखवते,  तर सध्या तो एका अभिनेत्याच्या घरी गेला होता आणि तो अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे आहे. दिलीपने अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी भेट दिली, जिथे त्याने अनेक जुने आणि मनोरंजक किस्से सांगितले. ‘ओम शांती ओम’च्या चित्रीकरणादरम्यानचा ही किस्सा त्याने सांगितला आणि त्यावेळे अभिनेता म्हणाला की  2007 मध्ये त्याला घर खरेदी करायचे होते आणि त्याला गृहकर्ज मिळू शकले नाही, ज्यामुळे तो खूप त्रस्त झाला होता. आणि ते त्याचे मुंबई मधील पहिले घर होते. त्यावेळी फराह खान आणि शाहरुख खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

तर काही गप्पा आणि जेवण झाल्यानंतर फराह त्याला अनेक भेटवस्तू देते. या भेटवस्तू पाहून, श्रेयसला ‘ओम शांती ओम’च्या काळातील दिवस आठवले. आणि तो सांगतो की याच चित्रपटामुळे तो त्याचे पहिले घर खरेदी करू शकला. श्रेयसच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला कोणतीही बँक त्याला कर्ज द्यायला तयार नव्हती, पण फराह खानचा एक फोन आणि शाहरुख खानच्या सहीमुळे त्याला त्याचे पहिले घर मिळण्यात मोठी भूमिका बजावली.

या घटनेची आठवण सांगताना श्रेयस तळपदे (talpade) म्हणतो, “मी बँकेत खूप फेऱ्या मारत होतो, पण ते मला कर्ज देत नव्हते पण मी एक चित्रपट करतो आहे. असे म्हणल्यानंतर त्यानी मला चित्रपटाचे नाव आणि सहकलाकारबाबत आणि दिग्दर्शकाबद्दल विचारले तेव्हा शाहरुख आणि फराह याच्याबाबत सांगितले आणि तेव्हा ते म्हणाले की त्याचे तुम्ही मला तिचे पत्र मिळवून देऊ शकता का?'” मग मी  “मी फराहला फोन केला आणि दोन दिवसांतच तिने मला शाहरुख खानकडून एक पत्र आणून दिले. मी हे पत्र बँकेत सादर करताच कर्ज मंजूर झाले.

‘गौरवने विश्वास तोडला, मुलीला खलनायक बनवले’,आकांक्षा चमोलाच्या वडिलांचा जावयावर संतप्त टिका

 

हे देखील वाचा