×

अभिनेत्री सारिका यांना जवळच्या नात्यांमधूनच कधी मिळाले नाही हक्काचे प्रेम, संघर्षातच व्यतीत झाले जीवन

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य नेहमीच आपल्याला भुरळ घालत असते. त्यांचे आलिशान राहणीमान, ग्लॅमरस जीवन, बक्कळ पैसा, नेम, फेम आदी अनेक गोष्टी आपल्याला हुरळून टाकतात मात्र या मागे या कलाकारांचे खरे आयुष्य काय आहे हे फक्त त्यांनाच माहित असते. जगासमोर नेहमीच सर्व काही ठीक असल्याच्या अविर्भाव आणणारे हे कलाकार कधी कधी खऱ्या आयुष्यात खूपच संकटांशी सामना करत असतात. आता जुन्या चित्रपटांमधील अभिनेत्री सारिकाचेच घ्या. आपल्या डोळ्यांनी आणि सौंदर्याने सारिका यांनी सर्वच लोकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडले. चित्रपटनमधून वेगवेगळ्या भूमिका साकारून नाव कमावलेल्या सारिका यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र खूपच संकटांनी आणि दुखणे भरलेले होते.

चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केलेल्या सारिका यांनी खप कमी वयात भरपूर नाव कमावले. सारिका या मनाविरुद्ध मनोरंजनविश्वात आल्या होत्या. सारिका लहान असताना त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. घरात कमावणारे कोणीच नव्हते. त्यामुळे खूपच कमी वयात सारिका यांच्यावर घराची आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी आली. आईला मदत करण्यासाठी सारिका यांनी कमी वयात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. घरात असणाऱ्या गरिबीमुळे सारिका कधीच शाळेत देखील जाऊ शकल्या नाही. लहान असताना त्या जे काही कमवायचा ते सर्व त्यांच्या आईला आणून द्यायच्या.

सारिका मोठ्या झाल्यानंतरही हेच चालू होते. पुढे त्यांनी आईच्या त्रासदायक स्वभावाला कंटाळून घर सोडल्या आणि त्या एकट्या चेन्नईमध्ये राहू लागल्या. इथे त्यांची भेट अभिनेते कमल हसन यांच्यासोबत झाली. कालांतराने दोघं जवळ आले आणि लिव्ह इनमध्ये राहू लागले. याच काळात सारिका यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी श्रुती ठेवले. श्रुतीच्या जन्मानंतर सारिका आणि कमल यांनी लग्न केले. पुढे त्यांना अजून एक मुलगी झाली अक्षरा.

दोन मुलींच्या जन्मानंतर कमल आणि सारिका यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आणि त्यांनी २००५ साली एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतर सारिकाच्या मुलींनी आईपेक्षा वडिलनसोबत राहणे पसंत केले. यामुळे सारिका यांना मोठा धक्का बसला. याचमुळे सारिका आणि त्यांच्या मुलींमध्ये देखील एक दरी निर्माण झाली. मात्र आता या सर्वांचे नाते सामान्य आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post