Friday, July 5, 2024

जेव्हा मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता सनी देओलसोबत किसींग सीन; म्हणाली, ‘तो खूपच…’

बॉलिवूडमध्ये 80 आणि 90चे दशक गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. यामध्ये मीनाक्षी शेषाद्री या अभिनेत्रीचाही समावेश आहे. मीनाक्षी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेली मीनाक्षी कामानिमित्त भारतात आली आहे. अशात तिने एक मुलाखत दिली, ज्यात तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. यादरम्यान तिने आपले सहकलाकार राजेश खन्ना, संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि सनी देओल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. यासोबतच तिने ‘डकैत’ सिनेमात सनी देओल याच्यासोबत दिलेल्या किसींग सीनबद्दलही चर्चा केली.

सिनेमात दाखवला नाही ‘तो’ सीन
‘डकैत’ (Dacait) हा सिनेमा सन 1987मध्ये राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri), सनी देओल (Sunny Deol), अभिनेत्री राखी, रजा मुराद, परेश रावल, उर्मिला मातोंडकर आणि सुरेश ओबेरॉय यांचाही समावेश होता. हा सिनेमा अशा व्यक्तीवर आधारित होता, जो जमीनदारांच्या अत्याचारांमुळे डाकू बनला होता. अभिनेत्री मीनाक्षीने मुलाखतीदरम्यान या सिनेमातील एका सीनबद्दल संवाद साधला.

‘डकैत’ सिनेमातील मीनाक्षी शेषाद्री आणि सनी देओल यांचा किसींग सीन (Meenakshi Seshadri And Sunny Deol Kissing Scene) चर्चेचा विषय ठरला होता. मुलाखतीदरम्यान मीनाक्षीने सांगितले की, या सिनेमात सनी देओलसोबत एका गाण्याच्या आधी त्यांचा एक किसींग सीनही होता. मात्र, सिनेमात तो दाखवला गेला नाही. कारण, सेन्सॉर बोर्डाने यावर कात्री मारली होती. म्हणजेच हा सीन सिनेमातून काढून टाकण्यात आला होता.

मीनाक्षीने या किसींग सीनबद्दल बोलताना म्हटले की, “सनी देओल खूपच तळमळीने काम करत होता. हा सीन करण्यामध्ये मी पूर्ण श्रेय त्याला देते.”

याव्यतिरिक्त अभिनेत्रीने संजय दत्त याच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, हे सांगितले. तिने सांगितले की, “मी त्याच्यासोबत एक फॅन मोमेंटने सुरुवात केली होती. जेव्हा मी त्याला टीना मुनीमसोबत रॉकी सिनेमाची शूटिंग करताना पाहिले होते, तेव्हा मी खूपच छोटी होते. त्यावेळी तो खूपच हँडसम आणि क्यूट वाटायचा.” पुढे बोलताना ती म्हणाली की, “यानंतर मला माझ्या ‘इनाम दस हजार’ या सिनेमात संजय दत्तसोबत काम करण्याची संधी मिळाली.”

यासोबतच अभिनेत्रीने बिग बींसोबतचाही अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “अमितजींसोबत ‘शहंशाह’ गाण्यादरम्यान घेतलेला एरियल शॉट मी कधीच विसरू शकत नाही.” पुढे राजेश खन्नांविषयी ती म्हणाली की, “ते सिनेमाच्या सेटवर कधीच उशिरा आले नाहीत आणि मला कधीही नवीन कलाकारासारखे वाटू दिले नाही.”

मीनाक्षी हिने बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमात काम केले आहे. यामध्ये ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहंशाह’, ‘घायल’, ‘घर हो तो ऐसा’, ‘मेरी जंग’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. एकापेक्षा एक सिनेमे देणारी मीनाक्षी सध्या तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहते. (Meenakshi Seshadri gave a kissing scene with Sunny Deol on the sets of Dakait)

आधिक वाचा-
हॅरी पॉटरला २२ वर्षे पूर्ण; जाणून घ्या, कुठे आणि काय करतायत चित्रपटातील कलाकार मंडळी?
‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

हे देखील वाचा