Monday, July 1, 2024

एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश

शशिकला शेषाद्री या उत्त्तम अभिनेत्री आणि कमालीच्या नृत्यांगना आहेत, ज्यांना आपण मीनाक्षी शेषाद्री याच नावाने ओळखतो. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी उत्तम चित्रपट देत प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांनी अल्पावधीतच अनेक संस्मरणीय चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. ज्यामध्ये ‘दामिनी’चे नाव देखील आहे. आज आम्ही तुम्हाला मीनाक्षी शेषाद्रीबद्दल सांगणार आहोत.

मीनाक्षी शेषाद्री (meenakshi seshadri) यांनी उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे बरेच नाव कमावले आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यावर सिनेसृष्टीला त्यांनी निरोप दिला होता. आता मीनाक्षी यांचा चेहरा खूप बदलला आहे. मीनाक्षी पती हरीश मैसूर आणि दोन मुलांसमवेत अमेरिकेच्या डलास येथे राहत आहेत.

मीनाक्षी यांनी हरीश मैसूर या अमेरिकन गुंतवणूकदार बँकर्सशी लग्न केले आहे. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाल्याचे बोलले जाते. दोघांची आधी छान मैत्री झाली, आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांचे लग्न झाले. हरीश यांच्यासोबत लग्न होण्यापूर्वी कुमार सानूसोबतच्या त्यांच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या होत्या.

मीनाक्षी शेषाद्री यांनी अवघ्या 17 व्या वर्षी 1981 मध्ये ‘मिस इंडिया’चे विजेतेपद जिंकले होते. मिस इंडियाचे विजेतेपद मिळवल्यानंतर, तीन वर्षांनी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘पेंटर बाबू’ होता. हा चित्रपट फार काही चालला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर मीनाक्षी यांनी कायमचे अभिनयातून बाहेर पडायचे ठरवले होते. पण दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले आणि आपल्या चित्रपटात काम करण्यास सांगितले. ‘हिरो’ या चित्रपटाने पडद्यावर कमाल करून दाखवली. त्या चित्रपटात होत्या मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी यांनी जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.

मीनाक्षी डलासमध्ये नृत्य वर्ग देखील चालवितात, आणि वेळोवेळी त्यांच्या संपूर्ण टीमसमवेत या कार्यक्रमांचा एक भाग होत असतात. त्यांनी बर्‍याच मोठ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या टीमबरोबर डान्स केला आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी ‘मेरी जंग’, ‘घायल’, ‘घर हो तो ऐसा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मीनाक्षी भारतात अधून मधून येत असतात. (meenakshi seshadri look change from damini movie to now see herepageid)

हेही वाचा-
लग्नाच्या दिवशी सेटवर काम आणि प्रसूतीनंतरही 3 दिवस काम, अशी आहे स्मृती इरानींची संघर्ष गाथा
शाळेत असताना बनायचे होते क्रिकेटर, ‘आशिकी 2’ चित्रपटाने आदित्य रॉय कपूरला दिली खरी ओळख

 

हे देखील वाचा