Tuesday, May 28, 2024

‘या’ व्यक्तीच्या भीतीने एका रात्रीत मीनाक्षी शेषाद्रीने सोडला देश, अजूनही परतली नाही मायदेशी

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने 80 ते 90 च्या दशकात तिच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. तिच्या अदा, अभिनय आणि डान्स या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मागील अनेक वर्षापासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, परंतु अजूनही प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ तेवढीच आहे. बुधवारी (16 नोव्हेंबर) मीनाक्षी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

मीनाक्षीचा जन्म 16 नोव्हेंबर 1963 मध्ये धनबादमध्ये झाला. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेली मीनाक्षी मागील 24 वर्षापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती शेवटची 1996 मध्ये ‘घातक’ या चित्रपटात दिसली होती. एका दिग्दर्शकाने केलेल्या लव्ह प्रपोजने ती तितकी घाबरली होती की, तिने एका रात्रीत केवळ बॉलिवूड नाही तर हा देश देखील सोडला होता. त्यानंतर ती पुन्हा कधीच भारतात परत आली नाही. मीनाक्षी सध्या तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेमध्ये राहते. मीनाक्षी अमेरिकेमध्ये डान्स क्लास चालवते. तसेच तिच्या टीमसोबत इव्हेंटमध्ये डान्स देखील करते. (Meenakshi Seshadri birthday special: let’s know about her life)

जेव्हा मीनाक्षीचे नाव इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत होते, तेव्हा तिचे नाव दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत जोडले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. या मागील सत्य तेव्हा समोर आले जेव्हा संतोषीने मीनाक्षीला प्रपोज केले. परंतु मीनाक्षीने या प्रपोजलला नकार दिला होता.

त्याने प्रपोज केल्यानंतर मीनाक्षी एवढी घाबरली होती की, तिने इंडस्ट्री नाही तर हा देश सोडला होता. यानंतर तिने बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले. ती केवळ 17 वर्षाची होती तेव्हा तिने ‘मिस इंडिया’ हा पुरस्कार जिंकला होता. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘पेंटर बाबू’ होता. परंतु तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

मीनाक्षीला ‘हिरो’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत जॅकी श्रॉफ होते. यानंतर तिने ‘होशियार’, ‘लव्ह मॅरेज’, ‘दिलवाला’, ‘सत्यमेव जयते’, ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’ यांसारख्या चित्रपटात काम केले. तिने तिच्या करिअरमध्ये ऋषी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल आणि विनोद खन्ना यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. मीनाक्षीने बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झाली. तिला जोश नावाचा मुलगा आणि केंद्रा नावाची एक मुलगी आहे.

सुरुवातीला कुमार सानु यांना मीनाक्षीवर प्रेम झाले होते. परंतु हे प्रेम नेहमीच एकतर्फी राहिले. ‘जूर्म’ या चित्रपटात कुमार सानूने ‘जब कोई बात बिगड जाये’ हे गाणे गायले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्यांची भेट मीनाक्षीशी झाली. मीनाक्षीला बघताच ते तिच्या प्रेमात पडले होते, परंतु त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या 58 व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर

दुख:द! अमिताभ बच्चन यांच्या लाडक्या मित्राचं निधन, बिग बींनी सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा