बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारा शो आहे. मराठीत देखील या शोचे दोन पर्व पूर्ण झाले आहे. अशातच तिसरे पर्व सुरू होऊन आता संपायला आले आहे. तिसरे पर्व संपण्यास आता केवळ शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. घरात आता केवळ ६ स्पर्धक शिल्लक होते. सगळेच स्ट्रॉंग होते. त्यामुळे आता घरातून कोण बाहेर जाईल असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.
अशातच घरातील शेवटचे एलिमिनेशन झाले आहे. दरवेळीपेक्षा हे एलिमिनेशन काही वेगळे होते. घरातील स्पर्धकांना मध्यरात्री उठवून हे एलिमिनेशन झाले आहे. यावेळी घरातून सर्वात चर्चेत असणारी स्पर्धक मीरा जगन्नाथ घरातून बाहेर गेली आहे. (meera jagnnath eliminate from bigg boss marathi 3)
नुकतेच झालेल्या एलिमिनेशनमध्ये बिग बॉसने सगळ्या स्पर्धकांना मध्यरात्री उठवून गार्डन एरियामध्ये बोलावून घेतले आणि हा टास्क पार पडला आहे. घरात या आठवड्यात विशाल सोडून सगळेच स्पर्धक नॉमिनेट होते. विशाल हा तिकीट टू फिनाले मिळवून टॉप ५ मध्ये गेला होता. त्यामुळे आता उरलेल्या ५ स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. विकास याला सर्वाधिक मते होती त्यामुळे तो सेफ झाला. त्यासोबत जय आणि उत्कर्ष देखील सेफ झाले. शेवटी मीनल आणि मीरा राहिल्या होत्या. त्यावेळी मीनलला जास्त व्होट असल्यामुळे ती सेफ झाली आणि मीरा घराबाहेर गेली. यावेळी मांजरेकर देखील चावडीवर उपस्थित होते. त्यांनीच या एलिमिनेशनचा निकाल जाहीर केला. मीराच्या जाण्याने घरातील स्पर्धकांना काही प्रमाणात दुःख झाले आहे.
अगदी दोन दुस्वासात फिनाले आला असून मीरा बाहेर गेल्याने सगळेच नाराज झाले आहेत. आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या परवाच्या ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरले जाईल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉसचा ग्रॅड फिनाले रविवारी (२६ डिसेंबर) रोजी होणार आहे.
हेही वाचा :
कलाकार असावेत तर असे, स्वीटू आणि ओमने चाहत्यांच्या लग्नात हजेरी लावून दिले मोठे सरप्राईज
व्हिडिओ: सुपरस्टार रणवीर सिंगने केले कपिल देव यांना किस? पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चाललंय?’
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत होणार लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण, प्रोमो व्हायरल