कलाकार असावेत तर असे, स्वीटू आणि ओमने चाहत्यांच्या लग्नात हजेरी लावून दिले मोठे सरप्राईज


झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला‘ ही एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे कलाकार अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी खूप लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते आहेत.

सोशल मीडियावर त्यांचे बरेच फॅनपेज चालू केले आहेत. त्यांना एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. आपल्या आवडत्या कलाकारांनी आपल्याला सेल्फी किंवा ऑटोग्राफ जरी दिला तरी चाहत्यांना खूप आनंद होतो. परंतु स्वीटू आणि ओमने त्यांच्या चाहत्यांना असे काही सरप्राईज दिले आहे की, त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (anvita phaktankar and shalv kinjawadekar attend fans wedding)

स्वीटू आणि ओमने चक्क त्यांच्या चाहत्यांच्या लग्नात त्यांना न सांगता हजेरी लावली आहे, त्यांनी इंस्टाग्रामवर सर्वांना विचारले होते की, १९ डिसेंबर रोजी कोणाकोणाचे लग्न आहे. त्यावेळी ते त्यांना कल्पना न देता त्यांच्या लग्नाला हजेरी लावली. ओम आणि स्वीटू यांनी त्यांचे चाहते सौरभ आणि जुहीच्या लग्नात हजेरी लावली, त्यासोबत त्यांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या लग्नाचे हे बेस्ट गिफ्ट आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत सध्या सकारात्मक वळणं आहे. मालिकेत ओम आणि स्वीटूचे लग्न झाले आहे. मागील काही काळात मालिकेत नकारात्मक ट्रॅक सुरू होता. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. परंतु मालिकेने काही वर्षांचा लीप घेऊन एका सकारात्मक कहाणी समोर आल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे मालिकेचा टीआरपीच्या पूर्वपदावर आला आहे.

हेही वाचा :

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत होणार लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण, प्रोमो व्हायरल

व्हिडिओ: सुपरस्टार रणवीर सिंगने केले कपिल देव यांना किस? पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चाललंय?’

बॉक्स ऑफिसवर यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-१’वर वरचढ ठरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’, पाहा दिवसानुसार कमाई 

 

 


Latest Post

error: Content is protected !!