Sunday, May 19, 2024

अमिताभ यांनी चाहत्यांना अनवाणी पायाने भेटण्याचा वर्षानुवर्षे जुना नियम माेडला, कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

मेगास्टार अमिताभ बच्चन वयाच्या 80व्या वर्षीही चांगलेच सक्रिय आहेत. बिग बी कामात कितीही व्यस्त असले तरी ते त्यांच्या चाहत्यांना वेळ द्यायला विसरत नाहीत. अभिनेता त्याच्या कामातून वेळ काढून दर रविवारी त्याच्या चाहत्यांना भेटतात. अभिनेता हा नियम अनेक वर्षांपासून पाळत आहेत. बिग बी दर रविवारी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटायला येतात. या सभेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यादरम्यान अभिनेता अनवाणी पायाने येतात. मात्र, अलीकडेच अभिनेत्याने आपला हा नियम माेडला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आपल्या चाहत्यांना मंदिरासारखे मानतात. म्हणूनच जेव्हा अभिनेता चाहत्यांना भेटायला जातात तेव्हा ते कसेही वातावरण असल तरी अनवाणी पायने जातात. अशात 25 जूनलाही अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलवा बाहेर आले होते. मात्र, यावेळी त्यांनी चाहत्यांना अनवाणी पायाने भेटण्याची परंपरा खंडित केली. अशात अमिताभ यांनी रविवारी (25 जुन)ला आपल्या ब्लॉगवर चाहत्यांना बूट घालून का भेटले याचा खुलासा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

ब्लॉगवर कारण स्पष्ट करताना, अमिताभ यांनी लिहिले, “…आणि आज खूप फरक आहे… शूज घालण्यात… मी शूज घातले होते. कारण, काल ​​दिवसभर अनवाणी पायाने शूटिंग केल्याने माझ्या पायावर फोड येण्याची समस्या वाढली हाेती, ज्याला बिलिस्टर असे म्हणतात.. याआधीही अशाच एका घटनेने मला खूप दिवस त्रास झाला होता, त्यामुळे काळजी घेत आहे… पण मंदिर अजूनही तसेच आहे, आणि पुढच्या वेळी शूज काढून येईन…”

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील आहेत. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. याशिवाय बिग बी रिभू दासगुप्ताच्या  ‘सेक्शन 84’मध्ये देखील दिसणार आहेत.(megastar amitabh bachchan breaks his ritual of meeting fans with barefoot reveals reason)

अधिक वाचा-
अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

रामानंद सागर यांच्या पणतीवर लैगिंक अत्याचार? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा