ट्विटरने 21 एप्रिल रोजी आपल्या पॉलिसीत मोठा बदल केला आहे. इलॉन मस्कच्या कंपनीने वेरिवाइड अकाउंट्स वरून ब्लू टिक्स काढून टाकल्या आणि त्याच अकाउंट्सला ब्लू टिक्सची परवानगी दिली, ज्यांनी पैसे दिले आहे. अशात अमिताभ बच्चन यांच्या नावासह चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंट्स वरून ब्लू टिक्स काढण्यात आली हाेती.
या प्रकरणानंतर अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी पैसे दिले असले तरी त्यांना ब्लू टिक देण्यात आलेली नव्हती. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले की, “पैसे भरल्यानंतरही त्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाय झाले नाही.” बिग बींच्या या पोस्टमध्ये त्यांच्या तक्रारींपेक्षा त्यांच्या अनोख्या भाषेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बींच्या या पोस्टनंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावर पुन्हा ब्लू टिक आली आणि त्यांनी आनंदही व्यक्त केला.
T 4623 – ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा ????जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
अशात अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा ट्विटर संबधी अडचण सांगितली आहे. खरेतर, लेगसी व्हेरिफाईड ब्लू टिक सबस्क्रिप्शन-आधारित बनवल्यानंतर, ट्विटरने जाहीर केले की, ’10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या खातेधारकांना ब्लू टिक विनामूल्य दिले जाईल.’
ट्विटरवरून ही माहिती समोर येताच बिग बींची शांतता पुन्हा एकदा भंग पावली. सुरुवातीला ते निळा टिक काढण्याची काळजी करत होते. मग त्यांना कळले की, ज्यासाठी त्यांनी पैसे दिले होते ते आता विनामूल्य आहे. अशा स्थितीत अमिताभ बच्चन यांना फसवणूक झाल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. अशात सोमवारी त्यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी एक नवीन पोस्ट शेअर केली.
आपला संभ्रम व्यक्त करताना अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले, “अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम । ए ! Twitter मौसी, चाची, बहनी, ताई, बुआ .. झौआ भर के त नाम हैं तुम्हार ! पैसे भरवा लियो हमार, नील कमल खातिर। अब कहत हो जेकर 1 m follower उनकर नील कमल free म। हमार तो 48.4 m हैं , अब ?? खेल खतम, पैसा हजम ?!”
T 4627 – अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम ????
ए ! Twitter मौसी, चाची, बहनी, ताई, बुआ .. झौआ भर के त नाम हैं तुम्हार ! पैसे भरवा लियो हमार, नील कमल ख़ातिर ✔️ अब कहत हो जेकर 1 m follower उनकर नील कमल free म
हमार तो 48.4 m हैं , अब ??
खेल खतम, पैसा हजम ?!????— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 23, 2023
अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट सोशल मीडियावर येताच युजर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. पोस्टवर मजेशीर कमेंट करत लोकांनी बिग बींना घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.(megastar amitabh bachchan feeling cheated after twitter free blue tick announcement shares hilarious tweet)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ प्रसिद्ध काॅमेडियन पुन्हा हसविणार प्रेक्षकांना, पुनरागमन झाले निश्चित