Tuesday, July 9, 2024

अमिताभ बच्चन यांनी ट्राेलर्सबाबत व्यक्त केलं मत; म्हणाले, ‘आता लोक मला गरीब अन् निर्बुद्ध…’

कोट्यवधी लोकांच्या प्रेमासोबतच कलाकारांना मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागते यात शंका नाही. नवोदित कलाकार असो किंवा बॉलीवूडचा सुपरस्टार, असा कोणताही स्टार नाही, ज्याला ट्राेल केले गेले नाही. अमिताभ बच्चन हे देखील त्यापैकीच एक. मात्र, आता वयानुसार त्यांवर टीका कमी झाल्याचे बिग बींचे म्हणणे आहे.

80 वर्षांचे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) केवळ फिल्मी दुनियेतच नाही, तर सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. अनेकदा ते ब्लॉगच्या माध्यमातून मनातील भाव मांडताना दिसतात. अशात नुकतेच ‘सुपरहिरो’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ यांनी वयानुसार ट्रोलिंग कमी झाल्याचे म्हटले आहे. अमिताभ यांनी त्यांच्या नवीनतम ब्लॉगमध्ये लिहिले आहे, “आता वयोमानानुसार हा विनोद कमी झाला आहे. आता काळाबरोबर लोक हे मान्य करत आहेत की, हा माणूस आता 81 वर्षांचा आहे, म्हातारा आणि निर्बुद्ध झाला आहे, याला सहन करा. ताे फार काळ जिवंत राहणार नाही. फार काळ टिकणार नाही. लोक प्रतिक्रिया देतात, गरीब माणूस, बालिश बुद्दी, त्याला असेच राहू द्या.”

बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पुढे सांगितले की, ते आजकाल सुट्टी कशी साजरी करत आहेत. ते या युगात ज्ञान मिळवण्यासाठी काही प्रश्न शोधत आहेत. ते म्हणाले, “म्हणून काही दिवसांची सुट्टी घ्या.मी दिवस चिंतन आणि नवचैतन्यात घालवतो. वयानुसार नाही, तर प्रतिबिंबाच्या जगात काय चालले आहे याचे ज्ञान मिळवण्यासाठी. काही ‘धर्मादाय’ का दिले जातात, काही गोष्टी का केल्या जात आहेत? एक नाव, एक कृती, आणि बरेच काही ‘का’ का केले जाते हे आश्चर्य आहे.”

अमिताभ बच्चन शेवटचे ‘उंचाई’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये दिसले होते. लवकरच ते प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत पॅन इंडिया चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील विशेष एक्सक्लूसिव फुटेज, कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये दाखवले जाईल.(megastar amitabh bachchan gets less criticism as he is getting old big b reveals)

अधिक वाचा-
श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी जान्हवीने आईला सांगितलेले ‘हे’ शेवटचे शब्द, वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास

हे देखील वाचा